ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

गुरु दक्षिणा,

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 29, 2019 06:35 PM 2019-02-12T14:15:30+5:30

गुरु दक्षिणा,

शहर : मुंबई

फार पूर्वीभागवनगर नावाचे एक छोटे खेडे होते. या खेड्यात एक झोपडीत एक गरीब विधवा आपल्या एकुलत्या एक मुलाबरोबर राहात असे. पतीचे छत्र गेल्याने गरीबीत कसा-बसा संसार रेटत असे. कुणाचे कपडे शिवुन दे. कुणाला घरकामात मदत करे, असे करुन ती चरितार्थ चालवत असे. तिचा मुलगाकृष्णा खूप हुशार आणि चुणचूणीत होता.

त्याला खूप शिकवावे अशी तिची इच्छा होती; पण त्या काळी गुरुकुल पध्दतीचे शिक्षण होते. मुलांना गुरुगृही रहावे लागे. छोटा कृष्णा आपल्याला सोडून कसा राहाणार ? म्हणून तिने पलीकडच्या गावातल्या एका आश्रमात त्याला पाठवायचे ठरवले. कृष्णा लहान, त्याला जाताना जंगलातून जावे लागे. पहाटे लवकर निघताना अंधार असे आणि परतताना संध्याकाळ होई.छोट्या कृष्णाला खूप भीती वाटे. पण हातातली कामे सोडून रोज पोहोचवायला जाणे आईला शक्य नव्हते. कधी गोड बोलून कधी रागावून ती त्याला एकट्याला पाठवत असे. नाईलाजानेकृष्णा जाई. मात्र ते गुरुजी श्रीमंत मुलांना जवळ बसवत कृष्णाला लांब बसायला लावत. त्याचे फाटके कपडे पाहून मित्र त्याला चिडवत, याचे त्याला वाईट वाटे.

त्याची आई त्याला गुरुशिष्यांच्या गोष्टी सांगे. त्या ऐकून आपले गुरु असे भेदभाव का करतात असा प्रश् त्याला पडे. एके दिवशी संध्याकाळी परतताना विचारांच्या नादात कृष्णा वाट चुकला. वाघाची डरकाळी ऐकून भीतीने गाळणच उडाली. इकडे आई काळजीत पडली. दोन-चार शेजार्यांना मदतीला घेऊन त्याला शोधायला निघाली. वाटेत एका झाडाखाली भीतीने मुटकुळे करुन बसलेला कृष्णा दिसताच तिला रडू आवरेना. कृष्णाने आईला मिठी मारुन रडायलाच सुरूवात केली. दोघेही घरी आले. आईचे ह्रदय कळवळले; पण तिला कर्तव्याचीही जाणीव होती. तिने मन कठोर केले आणि कृष्णाला शाळेत पाठवायला निघाली. कृष्णा एकटा जाईना. तेव्हा तिने त्याला भगवान कृष्णाचा फोटो दाखवला आणि सांगितले, ‘‘हा बघ कन्हैया दादा आहे तुझा. तो रोज तुझ्याबराबर येईल हो ! जंगलापाशी गेलास की, त्याला फक्त हाक मार मनापासून.’’छोट्या कृष्णाला खरे वाटले. पाठीवर दप्तर अडकवून मोठमोठ्याने स्तोस्त्र म्हणत जंगलापाशी आला. त्याने इकडे-तिकडे पाहिले. कोणीच नव्हते. त्याचे डोळे भरुन आले. ह्रदयापाशी हात नेऊन त्याने आर्त हाक मारली, ‘‘कन्हैयादादाल ये ना रे माझ्यासोबत. मला भीती वाटते रे !’’तोच काय आश्चर्य एक देखणा गुराखी गाई-वासरू घेऊन आला. नि त्याला म्हणाला, ‘‘का रं.. का रडतूयास म्या हाय नव्ह ! चल तुला नेऊन सोडतो !’’

त्याने छोट्या कृष्णाला गाईच्या पाठीवर बसवलं नि आश्रमापर्यंत सोडलं. वाटेत तो पावा वाजवी, कधी सुंदर भजन म्हणे. कृष्णाला वृक्षवेली, पशुपक्षांची माहिती सांगे. कृष्णा खूश होई. तो पावा वाजवायला शिकला. पशू पक्ष्यांचा आवाज ओळखायला शिकला. त्याला आश्रमात गुरुपेक्षा कन्हैयाच अधिक आवडू लागला. त्याला कौतुकानेहोय गुरुजी असे म्हणू लागला. दोघांची चांगलीच गट्टी जमली. कृष्णाची तब्येतही सुधारली. आईला याचे रहस्य कळेना. तिने विचारताच छोट्या कृष्णाने सार्या गंमती-जंमती, नि त्याच्या कन्हैयादादा च्या बद्दल सांगितले. आईचा विश्वास बसेना. तिने सारे हसण्यावारी नेले. हा हा म्हणता वर्ष उलटले.

आश्रमातल्या गुरुजींनी सर्व शिष्यांना एकत्र जमवले आणि सांगितले, ‘‘बाळांनो, आज तुमचे शिक्षण संपले. पुढील शिक्षण सुट्टीनंतर सुरु होईल. तेव्हा आज पर्यंतच्या शिक्षणा बद्दल आपण आपल्या पालकांना सांगून इच्छेनुसार गुरुदक्षिणा द्यावी.’’ सारी मुले सुट्टी मिळणार म्हणून खूश झाली. गुरुदक्षिणा काय द्यायची याची चर्चा करु लागली. कृष्णाला मात्र हे संकट वाटले. तो घरी गेला. त्याचा कोमेजलेला चेहरा पाहून आईने विचारले; पण तो काहीच बोलेना. आईने जवळ घेताच स्फुंदून रडू लागला. आईला गुरुदक्षिणे बद्दल सांगितले. ती बिचारी गंभीर झाली. आधीच घरात खायला नाही प्यायला नाही काय द्यावे. तिने देवघरात असलेली कृष्णाची मुद्रा असलेली घराण्याची मोहोर उचलली आणि देण्यास सांगितले. पण कृष्णा ती नेईना

मागे

आदर्श मित्रप्रेम
आदर्श मित्रप्रेम

कंबन हा तामिळनाडूमधील महाकवी होता. तो प्रतिभावान आणि सूक्ष्मदर्शी विद्वान....

अधिक वाचा

पुढे  

हुषार वानर
हुषार वानर

एका‍गावात समुद्रकिनार्‍याजवळ जांभळाचे झाड होते. त्या झाडावर रक्तमुख नां....

Read more