ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

कष्टाची कमाई

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 13, 2019 05:46 PM 2019-02-12T14:15:30+5:30

कष्टाची कमाई

शहर : मुंबई

ग्रीसमध्ये हेलाक नावाचा एक धनवान आणि लोभी माणूस राहत होता. आपल्या दुकानावर येणार्‍या प्रत्येक माणसाला ठकवणे त्याचे काम होते. त्यातून तो भरपूर धन जमा करायचा. मात्र ते धन त्याच्याकडे टिकत नसे. हे पाहून त्याची सून त्याला समजवायची की बेइमानीचे पैसे कधीच टिकत नसतात. परंतु हेलाक तिचे कधीच ऐकत नसे. एके दिवशी त्याच्या मनात विचार आला की सून जे म्हणते आहे त्याची परीक्षा घेऊन बघू. त्याने इमानदारीने धन जमा करून त्याचे एक सोन्याचे गंठण बनवले व ते एका कपडय़ात बांधले व त्यावर स्वत:चे नाव टाकून चौकात ठेवून आला. एकाने ते उचलून तळ्यात फेकून दिले. तळ्यातील एका मगरीने ते गिळले. काही दिवसांनी एका

मच्छीमाराला जाळ्यात ती मगर सापडली. त्यांनी तिचे पोट फाडले तेव्हा तिच्या पोटात ते गंठण निघाले, मच्छीमारांनी हेलाकचे नाव त्यावर पाहिले व बक्षिसाच्या आशेने गंठण त्याला आणून दिले. आपले सोन्याचे गंठण मिळालेले पाहून तो खूश झाला. त्याचा सुनेच्या बोलण्यावर विश्वास बसला की इमानदारीने मिळवलेले धन कुठेच जात नाही आणि बेइमानीचा पैसा कधीच टिकत नाही. त्याने खूश होऊन त्या मच्छीमारांना बक्षीस दिले.

 

 

मागे

टाकाऊपासून टिकाऊ
टाकाऊपासून टिकाऊ

छोट्या मित्रांनो, आपल्या घरात बर्‍याच नको असलेल्या वस्तू असतात. साफसफाई कर....

अधिक वाचा

पुढे  

गणपतीने आपल्या बुद्धिमत्तेने जिंकली शर्यत
गणपतीने आपल्या बुद्धिमत्तेने जिंकली शर्यत

एके दिवस शंकर पार्वतीनं आपल्या दोन्ही मुलांना जवळ बोलावले. गमंत म्हणून दोघ....

Read more