ठळक बातम्या शनिच्या अवकृपेपासून वाचण्यासाठी पिंपळवृक्षाखाली दिवा लावा!.    |     सूर्य देव कुंभात प्रवेश करेल, या राशींसाठी धन लाभाचे योग.    |     Magh Maas : पुण्य कमविण्यासाठी माघ महिन्याचे महत्त्व जाणून घ्या.    |     १०वी उत्तीर्णांसाठी संधी : लष्करात मेगा भरती.    |     पालकांनो इकडे लक्ष द्या, मुलांसाठी सॅनिटायझरचा वापर करताय !.    |    

निराश तरूण जात होता आत्महत्या करायला, संताने सांगितले संघर्षाचे महत्त्व

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: डिसेंबर 13, 2019 07:14 PM 2019-02-12T14:15:30+5:30

निराश तरूण जात होता आत्महत्या करायला, संताने सांगितले संघर्षाचे महत्त्व

शहर : मुंबई

एक तरूण मुलगा आयुष्यात संघर्ष करून खूप थकला होता, त्याला पैसे कमण्याचा कोणताच मार्ग सापडत नव्हता. म्हणून तो खूप निराश झाला आणि आत्महत्या करण्यासाठी जंगलात गेला. तेथे त्याला एक संत भेटले. संताने त्याला विचारले की, तू एकटा जंगलात काय करत आहेस?तरूणाने आपली सर्व समस्या संताना सांगितली. यावर संत म्हणाले तूला काम नक्कीच मिळेल. तू निराश होऊ नको. तरूण गुरूंना म्हणाला की मी हिम्मत हारलो आहे. मी आता काही करू शकत नाही.

संत तरूणाला म्हणाले मी तुला एक गोष्ट सांगतो, यामुळे तूझी निराशा दुर होईल. तर गोष्ट अशी आहे, एका लहान मुलाने एक बांबूचे आणि निवडूंगाचे झाड लावले. तो लहान मुलगा रोज दोन्ही झाडांची देखरेख करायचा. एक वर्ष असेच निघून गेले. निवडुंगाचे झाड टवटवीत दिसू लागले, पण बांबूचे झाड जसे होते तसेच राहिले. तो मुलगा निराश झाला नाही आणि दोन्ही झाडांची देखरेख करत राहिला.

असेच काही महिने निघून गेले, तरी काही बांबूचे झाड वाढत नव्हते. तो मुलगा तरीही निराश झाला नाही, त्याने झाडांची निगा राखने सुरूच ठेवले. काही महिन्यांनंतर बांबूचे झाड टवटवीत दिसू लागले आणि काही दिवसातच निवडुगांच्या झाडापेक्षाही मोठे झाले. म्हणजे, बांबूचे झाड आधी आपले मुळ मजबुत करत होते, म्हणून त्याला वाढायला थोडा वेळ लागला.

संत तरूणाला म्हणाले, आपल्या आयुष्यात जर संघर्ष करायची वेळ आली तर आपण त्याचा सामना करायला पाहिजे. जसा आपला पाया अधिक मजबूत होईल, आपण तेवढ्याच वेगाने यशाच्या शिखरापर्यंत जाऊ. तोपर्यंत धैर्य ठेवणे गरजेचे आहे. तरूणाला संतांची गोष्ट समजली आणि त्याने आत्महत्येचा विचार सोडून दिला.

कथेची शिकवण

आपल्या आयुष्यात जेव्हा वाईट वेळ येईल तेव्हा त्याचा योग्य वापर करा. वाईट काळात आपला पाया मजबुत करायला पाहिजे. म्हणजे आपली योग्यता ओळखून आपल्या चुका सुधारल्या पाहिजे. जर आपली कमतरता दुर झाली तरच आपण यशस्वी होऊ शकतो.

मागे

राजाने सुंदर महाल बांधून महालाच्या दारावर लिहिले एक गणिताचे सूत्र आणि घोषणा केली…
राजाने सुंदर महाल बांधून महालाच्या दारावर लिहिले एक गणिताचे सूत्र आणि घोषणा केली…

एक राजाने सुंदर महाल बांधून घेतला आणि मुख्य दारावर गणिताचे एक सूत्र लिहून घ....

अधिक वाचा

पुढे  

चांगली संधी मिळाल्यानंतर ती सोडू नये, अन्यथा…
चांगली संधी मिळाल्यानंतर ती सोडू नये, अन्यथा…

एकदा एका तरुणाने गुरुजींना विचारले, 'महाराज, मी जीवनात सर्वोच्च शिख गाठण्य....

Read more