ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

जीवन सार्थक आणि यशस्वी करण्यासाठी श्रीकृष्णाच्या जीवनातील ही सूत्रे दिशादर्शक आहेत.

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जुलै 05, 2019 11:16 AM 2019-02-12T14:15:30+5:30

जीवन सार्थक आणि यशस्वी करण्यासाठी श्रीकृष्णाच्या जीवनातील  ही सूत्रे दिशादर्शक आहेत.

शहर : मुंबई

मनुष्य जीवन दुर्लभ आहे. देवतांनाही मनुष्य जन्म घेण्यासाठी प्रतिक्षा करावी लागते. असे दुर्लभ जीवन नियोजनाअभावी, विचार करता असेच घालविले तर त्यात शहाणपण नाहीच. रोजच्या जगण्यात लग्न, व्यापार, नोकरी आणि इतर छोटी मोठी कामे करतानाही आपण नियोजन करतो. मग इतके मौल्यवान जीवन, नियोजन करता घालवणे योग्य होईल काय ? आणि जीवनाचे नियोजन, व्यवस्थापन करण्याची गोष्ट येते तेव्हा आपल्यासमोर नाव येते ते पूर्ण अवतार भगवान श्रीकृष्ण यांचे.

भगवान श्रीकृष्णाने सांगीतलेल्या  मौल्यवान गोष्टी येथे जाणून घेणार आहोत. जीवन सार्थक आणि यशस्वी करण्यासाठी ही सहा सूत्रे दिशादर्शक आहेत.

1. समर्पण. जीवनातील सर्वात महत्त्वाचे सूत्र आहे समर्पण. आपल्या कामाप्रती संपूर्ण समर्पण. एकदा विचारपूर्वक कार्यात झोकून दिले की मनात शंका आणि कुशंकांना स्थानच नको. संपूर्ण समर्पित वृत्तीने झोकून देऊन काम करा.

2. अविचल निष्ठा. कामाचे परिणाम काय होतील, असा विचार करून मनाला शीण आणू नका. थोडेही विचलित होण्याने कामावर परिणाम होतो. मन विचलित झाल्याने एकाग्रता भंग पावते. त्यामुळे कोणतेही काम नीट होणार नाही.

3. जीवनात अडचणी, दुख येणे स्वाभाविक आहे. अशा गोष्टींना प्रत्येकालाच तोंड द्यावे लागते. जीवनात येणा-या संघर्षातच जीवनाचे सौंदर्य आहे. तुम्ही या जगातील कोणत्याही सुंदर आणि सफल व्यक्तिमत्त्वाकडे पाहा. त्या व्यक्तींच्या जीवनातून दुख आणि संघर्ष काढले तर शिल्लक काय राहील. आयुष्यातील सुगंधच नष्ट होईल.

4. केंद्र. श्रीकृष्णाने पांडवांचे जीवन सफल बनविण्यासाठी सहकार्य केले. पांडव त्याचे नातेवाईक होते हे त्यामागचे कारण नाही. तसे असते तर कंस हा तर कृष्णाचा मामा होता. तरीही कृष्णाने त्याला ठार केले. पांडवांच्या मागे खंबीरपणे उभे राहण्याचे खरे कारण वेगळे आहे. कृष्णाच्या मनात पांडवांना स्थान होते कारण पांडव हे धर्म आणि नीतीने वागणारे होते. सुख दुखात त्यांनी धर्माचा, सत्याचा मार्ग सोडला नाही. त्यांनी आपल्या जीवनाच्या केंद्रस्थानी कृष्ण आणि धर्म यांना स्थान दिले. आपणही आपल्या जीवनाच्या केंद्रस्थानी सत्याला आणि भगवंताला स्थान दिले पाहिजे.

5. भावुकता. आपले जीवन भावनाप्रधान असावे. परंतु भावनेच्या भरात मानसिक संतुलन ढळता कामा नये. भावनेच्या भरात कर्तव्यापासून दूर जाणे योग्य नाही. भगवदगीता आपल्याला भावना आणि कर्तव्य याचे संतुलन शिकविते.

6. परिणामांची चिंता नको. सत्याचा, चांगला मार्ग हा नेहमी कठीणच असतो. त्यामुळे अशा मार्गाने चालताना मनुष्य वारंवार चिंतीत होतो. मन व्याकुळ बनते. चिंता आणि अस्वस्थता यामुळे वाईट परिणाम होतो. माणसाचे कामावर लक्ष्य लागत नाही. यामुळेआपल्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. श्रीकृष्ण सांगतात, कर्म करा. परिणामांची चिंता ईश्वरावर सोडून द्या.

मागे

चाणक्यांच्या अनुसार आपला सर्वात घातक  आजार कोणता ?
चाणक्यांच्या अनुसार आपला सर्वात घातक आजार कोणता ?

आजार, सदैव दुख आणि यातना देतो. आपण अस्वस्थ होतो, मानसिक शक्तीचे खच्चीकरण होत....

अधिक वाचा

पुढे  

योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची कला म्हणजेच जीवन जगण्याची कला
योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची कला म्हणजेच जीवन जगण्याची कला

एका कॉलेजमध्ये फिलॉसफीचे एक प्रोफेसर शिकवायचे. ते वेगवेगळ्या पध्दतींनी वि....

Read more