ठळक बातम्या शनिच्या अवकृपेपासून वाचण्यासाठी पिंपळवृक्षाखाली दिवा लावा!.    |     सूर्य देव कुंभात प्रवेश करेल, या राशींसाठी धन लाभाचे योग.    |     Magh Maas : पुण्य कमविण्यासाठी माघ महिन्याचे महत्त्व जाणून घ्या.    |     १०वी उत्तीर्णांसाठी संधी : लष्करात मेगा भरती.    |     पालकांनो इकडे लक्ष द्या, मुलांसाठी सॅनिटायझरचा वापर करताय !.    |    

चांगली संधी मिळाल्यानंतर ती सोडू नये, अन्यथा…

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: फेब्रुवारी 01, 2020 01:48 PM 2019-02-12T14:15:30+5:30

चांगली संधी मिळाल्यानंतर ती सोडू नये, अन्यथा…

शहर : मुंबई

एकदा एका तरुणाने गुरुजींना विचारले, 'महाराज, मी जीवनात सर्वोच्च शिख गाठण्याचा प्रयत्न करत आहे, पण मला कमी वेळेत यशस्वी व्हायचे आहे. तुम्ही मला असा मार्ग सांगू शकता काय, जिथून मी सहजपणे यशस्वी होऊ शकेन. गुरुजी म्हणाले नक्की सांगतो, त्यासाठी आश्रमाच्या बागेतून तू मला एक सुंदर फूल आणून देणे गरजेेचे आहे. पण एक अट आहे, जे फूल मागे सोडून देशील त्याच्याकडे मागे वळून पुन्हा बघायचे नाही.

तो तरुण खूप आनंदी झाला. कारण गुरुजींची परीक्षा त्याला खूप सोपी वाटत होती. युवक गुरुजींची अट मान्य करून आश्रमच्या बागेत गेला. तिथं खूप फुलं उमललेली होती. जे फूल तोडण्यासाठी हात पुढं करायचा तर त्याला त्याहून सुंदर फुलं पुढं दिसायची. त्यामुळे हातातील फूल सोडून तो पुढे जायचा.

अशा फुलांच्या शोधात तो बागेच्या शेवटच्या भागात कधी पोहोचला हे त्याच्या लक्षातही आले नाही. पण आता तो पुन्हा मागे जाऊ शकत नव्हता. बागेच्या शेवटच्या भागात असलेल्या फुलांपेक्षा बाकीची फुलं ही अधिक सुंदर होती. त्यामुळे तो फुलं तोडता रिकाम्या हाती परतला.त्याला रिकाम्या हाती परतलेलं बघून गुरुजींनी विचारलं, 'काय झालं? फूल का आणले नाही?' त्या युवकाने सांगितले, 'महाराज, बागेत इतकी सुंदर आणि ताजी फुलं होती की मी त्यांना सोडून पुढं निघून गेलो. तुम्ही अट घातल्याप्रमाणे मी मागे वळू शकत नव्हतो. त्यामुळे मी सुंदर फूल नाही तोडू शकलो.' यावर गुरुजींनी सांगितले, 'आपले जीवनही असेच असते. यामध्ये सुरुवातीला कर्म आणि मेहनत केली पाहिजे. अनेक वेळा चांगुलपणा आणि यश हे आपल्या कामातच लपलेलं असतं. जे लोभापोटी पुढे निघून जातात त्यांना रिकाम्या होतीच परतावे लागते.

शिकवण -: यशाच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचणारे लोक हे कठोर परिश्रम करतात. आलेल्या संधीचा लाभ करून घेतात. चांगली संधी मिळाल्यानंतर ती सोडू नये, अन्यथा नंतर अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

 

मागे

निराश तरूण जात होता आत्महत्या करायला, संताने सांगितले संघर्षाचे महत्त्व
निराश तरूण जात होता आत्महत्या करायला, संताने सांगितले संघर्षाचे महत्त्व

एक तरूण मुलगा आयुष्यात संघर्ष करून खूप थकला होता, त्याला पैसे कमण्याचा कोणत....

अधिक वाचा

पुढे  

ध्येय गाठण्यासाठी न घाबरता प्रत्येक क्षणाचा जे उपयोग करतात ते….
ध्येय गाठण्यासाठी न घाबरता प्रत्येक क्षणाचा जे उपयोग करतात ते….

एकदा एक शिष्य आपल्या गुरूला म्हणतो, मी माझे ध्येय कसे गाठू शकतो? गुरुजी त्या....

Read more