ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

शब्दाची किंमत म्हणजेच आपली स्वतःची किंमत!

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जून 03, 2019 06:15 PM 2019-02-12T14:15:30+5:30

शब्दाची किंमत म्हणजेच आपली स्वतःची किंमत!

शहर : मुंबई

आपल्या जीवनात वेळेला खूप महत्व आहे. वेळेचा उपयोग एखादा मनुष्य कशा रीतीने करतो, त्यावर त्याचे मोठेपण अवलंबून असते. एखाद्याचे पैसे उसने घेणे आणि परत करणे याला आपण फसवणूक म्हणतो. दिलेली अपॉईंटमेंट पाळणे हेही तेवढंच आक्षेपार्ह आहे, किंबहुना थोडं जास्तच. कारण, पैसे उशिरा का होईना, पण परत करता येतात. एखाद्याचा फुकट घालवलेला वेळ मात्र आपण कधीच परत करू शकत नाही. 5 वा. येतो म्हटल्यावर आपण ठीक 5 ला हजर राहायलाच पाहिजे! 2 मिनिटं उशीर झाला तरी तो उशीरच!

झेंडावंदनासाठी एक-एक, दोन-दोन तास बिचारी मुलं उन्हात उभी असतात, अध्यक्ष उशिरा येणार म्हणून. बंदोबस्तासाठी पोलिसांची तासन्तास रखडपट्टी होते आणि अचानक मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम बदलतो. जेवढा गायक मोठा तेवढा तो श्रोत्यांना जास्त ताटकळत ठेवतो. हे सगळं बदलायला हवं! ठरलेल्या दिवसापूर्वी मालाची डिलिव्हरी झाली नाही, तर वॉल मार्टसारखी कंपनी लक्षावधी डॉलर्सची ऑर्डर कॅन्सल करते. सर्जन ऑपरेशन थेटरमध्ये उशिरा आला तर अमेरिकेतला रोगी त्याला कोर्टात खेचू शेकतो.

दिलेली वेळ पाळणं याचाच अर्थ दिलेला शब्द पाळणं आणि आपल्या शब्दाची किंमत म्हणजेच आपली स्वतःची किंमत!

मागे

जादूचा फुगा
जादूचा फुगा

एक खूप छान नाजूक परी मऊ रेशीम किरणांनी विणलेला सुंदर सोनेरी झगा घालून कपाळा....

अधिक वाचा

पुढे  

व्यसने आपल्याला नव्हे, आपणच व्यसनांना धरून ठेवतो
व्यसने आपल्याला नव्हे, आपणच व्यसनांना धरून ठेवतो

आपल्या व्यक्तिमत्त्वातून वाईट गोष्टी काढून जीवनाचे नंदनवन बनवणे अगदी सोप....

Read more