ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

वेडात मराठे वीर दौडले सात

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मार्च 24, 2019 03:32 PM 2019-02-12T14:15:30+5:30

वेडात मराठे वीर दौडले सात

शहर : मुंबई

म्यानातुन उसळे तरवारीची पातवेडात मराठे वीर दौडले
म्यानातुन उसळे तरवारीची पातवेडात मराठे वीर दौडले सात॥धृ.॥

ते फ़िरता बाजुस डोळेकिन्चित ओले
सरदार सहा सरसवुनी उठले शेले
रिकबित टाकले पायझेलले भाले
उसळित धुळिचे मेघ सात निमिषात॥१॥

आश्चर्यमुग्ध टाकुन मागुती सेना
अपमान् बुजविण्या सात अरपुनी माना
छावणीत शिरले थेट भेट गनिमांना
कोसळल्या उल्का जळत सात दर्यात॥२॥

खालुन आग, वर आग ,आग बाजूंनी
समशेर उसळली सहस्त्र क्रुर इमानी,
गर्दीत लोपले सात जीव ते मानी
खग सात जळाले अभिमानी वणव्यात॥३॥

दगडावर दिसतील अजुनि तेथल्या टाचा
ओढ्यात तरन्गे अजुनि रंग रक्ताचा
क्षितिजावर उठतो अजुनि मेघ मातीचा
अद्याप विराणी कुणी वारयावर गात ॥४॥
म्यानातुन उसळे तरवारीची पातवेडात मराठे वीर दौडले सात

 

मागे

मोहामुळे भिकारी ठरला दुर्दैवी !
मोहामुळे भिकारी ठरला दुर्दैवी !

एक भिकारी दिवसभर पुष्कळ नामजप करायचा. देवाला त्याची दया आली. एक दिवस देव प्र....

अधिक वाचा

पुढे  

निळशार
निळशार

निळशार आयुष्य अमोघ लाटांच निळशार आयुष्य यादगार वाटांचं निळी निळाई  आभा....

Read more