By DAYANAND MOHITE | प्रकाशित: डिसेंबर 13, 2019 07:37 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
साहित्य -: अर्धा डझन उकडलेली अंडी, बारीक चिरलेले दोन मोठे कांदे व त्यास १:१ प्रमाणात ओले खोबरे, तेल, आले-लसूण पेस्ट, मालवणी किंवा गरम मसाला, जिरे, लाल तिखट आणि कोथिंबीर.
पाककृती -: कढईत तेल गरम करावे व त्यात कांदा सोनेरी होईपर्यंत परतून घ्यावा. त्यातच खोबरे, आले-लसूण पेस्ट परतून घ्यावी. हे मिश्रण कोथिंबीरसह मिक्सरमध्ये वाटून घ्यावे. पुन्हा तेल व जिरे टाकावे. जिरे तडतडल्यानंतर वाटप टाकून व्यवस्थित परतून घ्यावे. त्यात पुरेसे पाणी टाकून उकडलेली अंडी, मालवणी किंवा गरम मसाला, लाल तिखट व मीठ घालून एक उकळी काढावी. पोळी, ब्रेड किंवा भातासोबत या रूचकर करीचा आस्वाद घ्यावा.
साहित्य -: दोन मध्यम आकाराची कारली, जिरं पूड, गरम मसाला, किसलेलं खोबरं, फोडणी स....
अधिक वाचा