ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

अंड्याचा पुलाव

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मार्च 24, 2019 04:16 PM 2019-02-12T14:15:30+5:30

अंड्याचा पुलाव

शहर : मुंबई

साहित्य -:  

६ किंवा आवश्यकतेनुसार अंडी (उकडून, साले काढून आणि काट्याने मध्ये मध्ये अलगद टोचे मारुन)

दोन वाट्या तांदुळ

दोन कांदे चिरुन

अर्धा वाटी दही

२ चमचे आल-लसुण पेस्ट

१ मोठा चमचा मसाला किंवा १ लहान चमचा तिखट

फोडणीसाठी तेल,चविनुसार मिठ

कोरडा मसाला:

१ चमचा जिर

१ चमचा धणे

दालचिनी १ ते २ तुकडे

३ वेलच्या

४-५ लवंग

पाककृती -:

कोरड्या मसाल्याचे सामान तव्यावर थोडे भाजून मिक्सर मध्ये पुड करा. कुकर किंवा भांडे गॅसवर चांगले तापवून तेलावर कांदा गुलाबी रंगाचा होईपर्यंत परतवा. नंतर त्यावर आल-लसुण पेस्ट व कोरडा मसाला टाकुन परतवा. त्यावर दही व मसाला घालून परतवा. आता मिश्रण ढवळून त्यात अंडी घालून हलकेच परतवा. आता तांदुळ आणि मिठ घालून हलक्या हाताने सगळे परतवा. आता तांदुळाच्या दुप्पट किंवा तुम्ही नेहमीच्या अंदाजाने पाणी घाला. जर कुकर लावत असाल तर थोडे कमी घाला. पुन्हा थोडे ढवळून कुकर लावा किंवा टोपात शिजू द्या. कुकरच्या तिन शिट्यात पुलाव तयार होतो. पातेल्यात करत असताना मधूनच एक-दोनदा अलगद परतत रहा.झाला आहे तयार अंड्याचा पुलाव.

 

मागे

सुखे चिकन
सुखे चिकन

साहित्य -: • चिकन, 8 तुकडे 800 ग्रॅम • सुखी लाल मिरची, 6 • आले, उभा 1 इंच जाड तु....

अधिक वाचा

पुढे  

खिमा-पाव
खिमा-पाव

साहित्य -:   २५० ग्रॅम मटण खिमा १ मोठा कांदा १ टेबलस्पून आलं-लसूण पेस्ट २....

Read more