By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 28, 2019 08:06 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
साहित्य -:
२ चिंबोऱ्या, १ टोमॅटो, २ चमचे बेसन, २ चमचे शेंगदाण्याचे कूट, ४ चमचे नारळाचा सुका कीस, १ चमचा गरम मसाला, १ चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, १ चमचा आलं-लसूण पेस्ट, बारीक चिरलेली कोथिंबीर २ चमचे, मीठ.
कृती -:
चिंबोऱ्या नीट साफ करून घ्याव्यात. टोमॅटोची प्युरी करून घ्यावी. त्यात बेसन, शेंगदाण्याचे कूट, नारळाचा कीस, आलं-लसूण पेस्ट, लाल तिखट, हळद, गरम मसाला आणि मीठ असं सर्व घालून एकत्र करावं. हा मसाला चिंबोरीमध्ये भरून त्याला धाग्याने बांधून टाकावं. आता कढईत थोडं तेल घेऊन त्यात उरलेला मसाला घालून परतावं आणि त्यातच बांधलेल्या चिंबोऱ्या टाकाव्यात. व्यवस्थित शिजल्यावर वरून कोथिंबीर घालावी. आता भरलेल्या चिंबोऱ्या खायला तयार!
साहित्य -: 1 किलो लोणच्याच्या मोठ्या मिरच्या, आलं 1 लहान तुकडा, 750 ग्रॅम दही, 6 ....
अधिक वाचा