By DAYANAND MOHITE | प्रकाशित: डिसेंबर 07, 2019 04:27 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
साहित्य -: दोन मध्यम आकाराची कारली, जिरं पूड, गरम मसाला, किसलेलं खोबरं, फोडणी साहित्य - तेल, हिंग, जिरं, मोहरी, चवीनुसार मीठ.
कृती -: कारल्याचं साल काढून त्याचे बारीक तुकडे करून घ्यावेत. कारल्याच्या तुकड्यांत मीठ टाकावं आणि ते चांगले चुरून घ्यावेत. नंतर पाणी घालून तुकडे घटृ पीळून घ्यावेत. फोडणी साठी तेल गरम करून घ्यावं आणि त्यामध्ये हिंग, जिरं, मोहरी, हळद टाकावी. आता कारल्याचे तुकडे व थोडे मीठ (चवीनुसार) तेलात घालून चांगलं परतावं व झाकण ठेवून एक वाफ काढावी. नंतर झाकण काढून ठेवावं आणि किसलेलं खोबरं घालावं. कारली कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्यावीत. अर्धा चमचा जिरे पूड आणि हवा असेल तर गरम मसाला घालावा. गरमागरम कुरकुरीत कारली वरण भातासोबत वाढावी.
साहित्य-: एक वाटी पिकलेल्या पपईचा गर, दीड वाटी कणीक, हिंग, पाव चमचा हळद, एक चमचा....
अधिक वाचा