ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

देशी मुर्ग प्याजी

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जून 03, 2019 05:28 PM 2019-02-12T14:15:30+5:30

देशी मुर्ग प्याजी

शहर : मुंबई

साहित्य -: 1 किलो देशी चिकन, 1/2 किलो कांदे चिरलेले, 2-3 लसूण पाकळ्या, 1 कप टोमॅटो बारीक चिरलेले, 1 चमचा जिरं, 1 चमचा तिखट, 2 बटाटे कापलेले, 1 लहान तुकडा दालचिनी, 3-4 वेलची, 3-4 लवंगा, 2 तेजपान, 3 मोठो चमचे तेल.

कृती -: सर्वप्रथम वेलची, लवंगा आणि दालचिनी यांचे पेस्ट तयार करावे. चिकनमध्ये चिरलेल्या कांद्यापैकी अर्धे मिक्स करावे. लसणाच्या पाकळ्यासुद्धा अर्ध्या मिसळाव्या. टोमॅटो घालावे, 1/2 चमचा तिखट, जिरं आणि हळद घालावे. मीठ आणि 1 चमचा तेल लावून 2 तासासाठी मेरीनेट करावे. कढईत तेल गरम करत ठेवावे. उरलेलं जिरं घालून कांदा लसुण परतून घ्यावे. तिखट घालून 1 मिनिट परतावे. मेरीनेट चिकन आणि बटाटे टाकावे. 5 मिनिट शिजल्यावर 1/2 वाटी पाणी घालून कमी आचेवर शिजू द्या. सर्व्ह करताना गरम मसाला वरून घालावे.

मागे

भरल्या कांद्याची भाजी
भरल्या कांद्याची भाजी

साहित्य -: लहान आकाराचे कांदे 1/2 किलो, किसलेले खोबरे पाव वाटी, 4 चमचे तीळ, 250 ग्रॅ....

अधिक वाचा

पुढे  

मटण दम बिर्याणी
मटण दम बिर्याणी

साहित्य-: अर्धा किलो मटण, बासमती तांदूळ तीन वाटय़ा, आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर, द....

Read more