ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

दिलखुश कबाब

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जून 21, 2019 07:09 PM 2019-02-12T14:15:30+5:30

दिलखुश कबाब

शहर : मुंबई

साहित्य -: खिमा पाव किलो, दोन बटाटे उकडून, भिजवून जाडसर वाटलेली चनाडाळ, एक अंडे, दोन-तीन स्लाईस ब्रेड, हळद, दोन चिरलेले कांदे, आले एक इंच, लसूण आठ दहा पाकळ्या, एक टी स्पून गरम मसाला पावडर, पाव वाटी कोथिंबीर, लिंबूरस, पुदिना, तेल, मीठ, रवा पाव वाटी.

कृती -: सर्वप्रथम बटाटे उकडून स्मॅश करून घ्यावे. खिमा वाटून घ्यावा. आले-लसूण पेस्ट, पुदिना पेस्ट, हळद मीठ लावून खिमा आवश्यक तेवढ्याच पाण्यात शिजवून घ्यावा. वाटलेली चनाडाळ, ब्रेडचे स्लाईस, चिरलेले कांदे, बटाटे, अंडे, कोथिंबीर, लिंबूरस, तिखट मीठ चवीनुसार घालावे गोल कबाब करून त्यात घोळवून गरम तेलात तळून घ्यावे.

सर्व्ह करताना किंचित तूप शिंपडून गॅसवर तंदूर करावे टोमॅटो सॉसबरोबर खावयास द्यावे.

 

मागे

मटण कोरमा
मटण कोरमा

साहित्य -: 750 ग्रॅम बोनलेस मटण, 100 मिली तेल, 300 ग्रॅम बारीक कापलेला कांदा, 25 ग्रॅम आ....

अधिक वाचा

पुढे  

पालक फिश
पालक फिश

साहित्य -: 500 ग्रॅम मासे, 1 कांदा चिरलेला, 1 टोमॅटो चिरलेला, 1 इंच आल्याचा तुकडा, 4-5 ....

Read more