ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

डिंकाचे लाडू

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जुलै 31, 2019 07:05 PM 2019-02-12T14:15:30+5:30

डिंकाचे लाडू

शहर : मुंबई

साहित्य -: पाव किलो डिंक, अर्धा किलो सुके खोबरे, अर्धा किलो खारीक, एक वाटी खसखस, पाव वाटी बादाम, एक किलो गूळ किंवा साखर, बिब्ब्याच्या बिया, अर्धी वाटीसाजूक तूप.

 

कृती -: साधारणपणे हरभर्याच्या डाळीएवढा बारीक होईल, इतपत डिंक जाडसर कुटावा. नंतर डिंकाला तुपाचा हात लावून तो उन्हात ठेवावा. खोबरे किसून, भाजून घ्यावे. खारकांची पूड करून घ्यावी. खसकस भाजून घ्यावी. बदाम सोलून त्यांचे जाड काप करून घ्यावेत. बिब्ब्याच्या बिया तळून किंवा तुपामध्ये तळून त्यांच्या लाह्या करून घ्याव्या. थोडे तूप टाकून खारकांची पूड भाजून घ्यावी. नंतर साखरेचा किंवा गुळाचा पक्का पाक करून, त्यात अर्धी वाटी तूप घालावे. नंतर त्यात डिंक त्यात डिंक तयार करून घेतलेले वरील इतर सर्व साहित्य घालावे. चांगले मिसळून घेऊन लाडू वळावे. हे लाडू गरमच वळावे लागतात. हे लाडू उपवासालाही चालतात.

मागे

मलई मिरची
मलई मिरची

साहित्य:  एक कप हिरव्या मिरच्या चिरुन तुकडे (तुकडे साधारण बोटाच्या पेराच....

अधिक वाचा

पुढे  

चमचमीत मिसळ
चमचमीत मिसळ

साहित्य -: 500 ग्रॅम मोड आलेली मटकी , 2 कांदे ,2 टोमॅटो , 10-12 लसूण पाकळ्या ,4-5 हिरव....

Read more