ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

फ्राय अंडा रस्सा

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 22, 2019 04:11 PM 2019-02-12T14:15:30+5:30

फ्राय अंडा रस्सा

शहर : मुंबई

साहित्य

उकडलेली अंडी, चमचे आले-लसूण वाटलेले, वाटी कांद्याचे वाटण, वाटी टोमॅटोचा रस, अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचे वाटण, तमालपत्रे, चमचा गरम मसाला, चमचा तिखट, अर्धा चमचा धनेजिरे पावडर, अर्धी वाटी बेसन, चमचे खसखस आणि तिळाचे वाटण, वाटी तेल, मीठ चवीनुसार.

कृती

प्रथम अंडे सोलून सुरीने त्याचे दोन भाग करावेत. बेसनामध्ये मीठ घालून ते भज्याच्या पीठाप्रमाणे सरसरीत भिजवून घ्यावे. यात अंडे बुडवून ते चांगले तळून घ्यावे. आता एका पातेल्यात तेल गरम करून त्यात तमालपत्र, आले-लसूण वाटण, कांद्याचे वाटण, खसखस आणि तिळाचे वाटण, टोमॅटोचा रस आणि सर्व मसाले घालावेत. याला तेल सुटल्यावर खोबऱ्याचे वाटण घालावे. पाणी घालून मग उकळी आणावी आणि तळलेली अंडी त्यात घालून गॅस बंद करावा.

 

मागे

ओला बोंबिल कबाब
ओला बोंबिल कबाब

साहित्य पाच ओले बोंबिल एक ते दीड चमचा लसूण-आले १५ लसणांच्या पाकळ्या  ७....

अधिक वाचा

पुढे  

कुळथाची पिठी
कुळथाची पिठी

साहित्य -: एक वाटी कुलथाचं पीठ, एक मोठा कांदा, एक टोमॅटो, आठ-दहा सोललेल्या लसूण ....

Read more