ठळक बातम्या शनिच्या अवकृपेपासून वाचण्यासाठी पिंपळवृक्षाखाली दिवा लावा!.    |     सूर्य देव कुंभात प्रवेश करेल, या राशींसाठी धन लाभाचे योग.    |     Magh Maas : पुण्य कमविण्यासाठी माघ महिन्याचे महत्त्व जाणून घ्या.    |     १०वी उत्तीर्णांसाठी संधी : लष्करात मेगा भरती.    |     पालकांनो इकडे लक्ष द्या, मुलांसाठी सॅनिटायझरचा वापर करताय !.    |    

गोवन फिश करी

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मार्च 24, 2019 04:04 PM 2019-02-12T14:15:30+5:30

गोवन फिश करी

शहर : मुंबई

साहित्य -:

सुरमई, साधारण अर्धा किलो

ओलं नारळ, एक छोटी वाटी

धणे, दोन चमचे (चहाचे)

जिरं, एक चमचा (चहाचा)

लाल सुकी मिर्ची, तिखट सोसण्याच्या आपापल्या कुवतीनुसार

ब्याडगीचं तिखट, (दोन छोटे चमचे, तिखट-मिठाच्या पाळ्यातले)

लाल कांदा, पिटुकला

टमाटा, छोटा,अर्धा

लसूण पाकळ्या, चार-पाच

आलं, अगदी पाव इंचं

हिरवी मिर्ची, एक, चवीपुरता

चिंचं, छोट्या लिंबाएवढी

चिमुटभर,हळद,मीठ,पाणी

पाककृती -:

सुरमईचे तुकडे, स्वछ धुतलेले, एका भांड्यात घेऊन त्याला हळद, मीठ आणि एखाद पाकळी बारिक चिरलेला लसूण लावून बाजुला ठेवून द्या.

 

मिक्सरच्या छोट्या भांड्यात नारळ, मिर्च्या, आलं, लसूण, कांदा, टमाटा, धणे-जिरे, लाल तिखट, चिंचं, मीठ आणि पाणी असं सगळं अगदी बारीक वाटून घ्या.

एका मध्यम आकाराच्या पातेल्यात ही वाटण घेउन मध्यम आचेवर ठेवा आणि थोडा वेळ परतून घ्या. जरा कोरडा होतोय मसाला असं वाटलं कि त्यात साधारण तीन-चार वाट्या पाणी घाला. साधारण सूपच्या जवळपास जाणारी consistency अपेक्षित आहे.

मस्त उकळी फुटली कि त्यात आधी मेरिनेट करून ठेवलेले माशाचे तुकडे सोडा.झाकण ठेऊन दहा-बारा मिनिटं उकळू द्या.

मग अवडत असल्यास वरून झक्कासपैकी कोथिंबीर पेरा आणि वाफाळत्या भाताबरोबर खायला घ्या.

मागे

मोड आलेल्या मेथी दाण्याची भाजी
मोड आलेल्या मेथी दाण्याची भाजी

साहित्य -: १. मोड आलेले मेथी दाणे = १ वाटी २. कीसमीस = पाव वाटी ३. एक कांदा, उभा ....

अधिक वाचा

पुढे  

सुखे चिकन
सुखे चिकन

साहित्य -: • चिकन, 8 तुकडे 800 ग्रॅम • सुखी लाल मिरची, 6 • आले, उभा 1 इंच जाड तु....

Read more