ठळक बातम्या शनिच्या अवकृपेपासून वाचण्यासाठी पिंपळवृक्षाखाली दिवा लावा!.    |     सूर्य देव कुंभात प्रवेश करेल, या राशींसाठी धन लाभाचे योग.    |     Magh Maas : पुण्य कमविण्यासाठी माघ महिन्याचे महत्त्व जाणून घ्या.    |     १०वी उत्तीर्णांसाठी संधी : लष्करात मेगा भरती.    |     पालकांनो इकडे लक्ष द्या, मुलांसाठी सॅनिटायझरचा वापर करताय !.    |    

पालक फिश

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जून 21, 2019 07:15 PM 2019-02-12T14:15:30+5:30

पालक फिश

शहर : मुंबई

साहित्य -: 500 ग्रॅम मासे, 1 कांदा चिरलेला, 1 टोमॅटो चिरलेला, 1 इंच आल्याचा तुकडा, 4-5 लसणाच्या पाकळ्या, 5-6 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या, 1 चमचा हळद, 1/2 चमचा मसाला, 2 कप पालक, 1/2 चमचा धने पूड, 1 चमचा जिरे पूड, 1 चमचा लिंबाचा रस, थोडे हिंग, मीठ चवीनुसार, 1 मोठा चमचा तेल आणि बारीक चिरलेली कोथिंबीर.

कृती -: सर्वप्रथम मासे स्वच्छ धुऊन त्याचे छोटे छोटे काप करावे. एका कटोर्यात लिंबाचा रस, हळद आणि मीठ घेऊन त्यात माशांचे तुकडे घालावे चांगल्याप्रकारे एकजीव करावे. हे मिश्रण 1 तास तसेच ठेवावे. पालकाला स्वच् धुऊन चिरून घ्यावे. कांदा-लसणाची पेस्ट तयार करावी. एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यात हिंग, कांदा- लसणाची पेस्ट आणि हिरव्या मिरच्या घालून शिजू द्यावे. नंतर त्यात त्यात चिरलेला कांदा घालून परतून त्यात टोमॅटो आणि पालक घालून 2-3 मिनिट शिजवावे.

5 मिनिटानंतर त्यात गरम मसाला, जिरे-धने पूड घालून परतून घ्यावे. त्यात पाणी घालून 5-7 मिनिट शिजू द्यावे. नंतर त्यात माशांचे तुकडे मीठ घालून शिजवावे. वरून कोथिंबीर घालून सर्व्ह करावे.

मागे

दिलखुश कबाब
दिलखुश कबाब

साहित्य -: खिमा पाव किलो, दोन बटाटे उकडून, भिजवून जाडसर वाटलेली चनाडाळ, एक अंड....

अधिक वाचा

पुढे  

स्वयंपाक शिकताना लक्षात ठेवण्यासारख्या महत्वाच्या गोष्टी ...
स्वयंपाक शिकताना लक्षात ठेवण्यासारख्या महत्वाच्या गोष्टी ...

सध्या तरुण मुलींना स्वयंपाक शिकण्यासाठी पुरेसा वेळ नसतो. काही जणींना आवडही....

Read more