ठळक बातम्या शनिच्या अवकृपेपासून वाचण्यासाठी पिंपळवृक्षाखाली दिवा लावा!.    |     सूर्य देव कुंभात प्रवेश करेल, या राशींसाठी धन लाभाचे योग.    |     Magh Maas : पुण्य कमविण्यासाठी माघ महिन्याचे महत्त्व जाणून घ्या.    |     १०वी उत्तीर्णांसाठी संधी : लष्करात मेगा भरती.    |     पालकांनो इकडे लक्ष द्या, मुलांसाठी सॅनिटायझरचा वापर करताय !.    |    

पपईच्या पुऱ्या

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: डिसेंबर 07, 2019 04:22 PM 2019-02-12T14:15:30+5:30

पपईच्या पुऱ्या

शहर : मुंबई

साहित्य-: एक वाटी पिकलेल्या पपईचा गर, दीड वाटी कणीक, हिंग, पाव चमचा हळद, एक चमचा तिखट, पाव चमचा धणे-जिरे पूड, एक चमचा तीळ, चवीनुसार मीठ, तळण्यासाठी तेल.

कृती-: प्रथम एका बाऊलमध्ये पपईचा गर घेऊन त्यामधे कणीक, हिंग, हळद, तिखट, धणे-जिरे पूड, तीळ, एक चमचा तेल चवीनुसार मीठ घालून घट्ट गोळा मळून घ्या.नंतर त्या गोळ्याचे छोटे-छोटे गोळे करुन पुऱ्या तयार करुन हलक्या लाल रंगावर तळून घ्याव्या. या गरमागरम पुऱ्या आवडीच्या भाजीसोबत सर्व्ह कराव्यात.

टीप-: पुऱ्यांकरता पपई पिकलेलीच घ्यावी सर्व साहित्य टाकण्याआधी पपई छान घोटून घ्यावी.

मागे

कुळथाची पिठी
कुळथाची पिठी

साहित्य -: एक वाटी कुलथाचं पीठ, एक मोठा कांदा, एक टोमॅटो, आठ-दहा सोललेल्या लसूण ....

अधिक वाचा

पुढे  

कुरकुरीत कारलं
कुरकुरीत कारलं

साहित्य -: दोन मध्यम आकाराची कारली, जिरं पूड, गरम मसाला, किसलेलं खोबरं, फोडणी स....

Read more