ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

रक्षाबंधन स्पेशल : नारळी भात

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 07, 2019 05:10 PM 2019-02-12T14:15:30+5:30

रक्षाबंधन स्पेशल : नारळी भात

शहर : मुंबई

साहित्य -: दोन वाटी बासमती तांदूळ, चार वाटी पाणी, चार टे. स्पू. साजूक तूप, दोन-तीन लवंग, वेलची पूड, दोन वाटी किसलेला गूळ, दोन वाटी खोवलेलं ओलं नारळ, आठ-दहा काजू, अर्धी वाटी बेदाणे, केशर काड्या आणि थोडा केशरी रंग.

कृती -: तांदूळ धुवून चाळणीत निथळत ठेवावे. जाड बुडाच्या पातेल्यात तूप गरम करून लवंग परतून तांदूळ टाकून दोन-तीन मिनिटं परतावेत. तांदूळ परतल्यावर पाणी गरम करून टाकावं. पातेल्यावर झाकण ठेवून मध्यम आचेवर भात शिजवावा. भात शिजल्यावर हलक्या हातानं परातीत पसरवून गार करावा. भातात नारळ, गूळ, वेलची पूड, केशरी रंग हलक्या हातानं मिक्स करावा. पातेल्यात तूप तापवून काजू, बेदाणे परतावेत. परतून झाल्यावर ते वाटीत काढून ठेवावेत. तुपात मंद आचेवर भाताचं मिश्रण घालावं. झाकण ठेवून चार-पाच वाफा काढाव्यात. मधून मधून भात हालवावा. 0-१५ मिनिटांनी तळलेले काजू-बेदाणे, केशर वरती पसरवून गॅस बंद करावा.

मागे

पंचरत्न मोदक
पंचरत्न मोदक

सामग्री -: दोन वाफवलेले बटाटे, 50 ग्रॅम शिंगाड्याचे पीठ, 100 ग्रॅम खवा, अर्धी वाटी....

अधिक वाचा

पुढे  

मायक्रोव्हेव मधील साबुदाणा खिचडी
मायक्रोव्हेव मधील साबुदाणा खिचडी

साहित्य -: ३ वाटी भीजलेला साबुदाणा, पाऊण वाटी दाण्याचे कुट, २ ते ३ हिरव्या मिर....

Read more