ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

कुळथाची पिठी

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: डिसेंबर 07, 2019 04:17 PM 2019-02-12T14:15:30+5:30

कुळथाची पिठी

शहर : मुंबई

साहित्य -: एक वाटी कुलथाचं पीठ, एक मोठा कांदा, एक टोमॅटो, आठ-दहा सोललेल्या लसूण पाकळ्या, फोडणीसाठी जिरं-मोहरी, दीड चमचा मिरची पावडर, थोडी हळद, दीड पळी तेल, चवीपुरतं मीठ-साखर.

कृती -: एका भांड्यात कुलथाचं पीठ घेऊन त्यात पाणी ओतून ते नीट एकजीव करा. हे पीठ चांगलं पातळ झालं पाहिजे. त्यात गुठळ्या राहू देऊ नका. नंतर गॅसवर लोखंडी कढई ठेवून त्यात जरा जास्तच तेल टाका. तेल कडकडीत तापल्यावर जिरं-मोहरीची फोडणी द्या. ती तडतडल्यावर लसूण पाकळ्या ठेचून टाका. लसणाचा वास घमघमल्यावर बारीक चिरलेला कांदा टाका. कांदा शिजत आल्यावर त्यात हळद-मसाला आणि बारीक चिरलेला टोमॅटो टाका. मीठ-साखर टाका. हे सगळं मिश्रण नीट शिजून एकजीव झाल्यावर त्यात पाण्यात कालवलेलं कुळथाचं पीठ टाका आणि झाकण मारा. पाचेक मिनिटात पिठी मस्त शिजते. तिचा वास घरात दरवळायला लागला की, गॅस बंद करा आणि लगेच पिठी भाताबरोबर हाणायला सुरुवात करा.

मागे

फ्राय अंडा रस्सा
फ्राय अंडा रस्सा

साहित्य ४ उकडलेली अंडी, २ चमचे आले-लसूण वाटलेले, १ वाटी कांद्याचे वाटण, १ वाट....

अधिक वाचा

पुढे  

पपईच्या पुऱ्या
पपईच्या पुऱ्या

साहित्य-: एक वाटी पिकलेल्या पपईचा गर, दीड वाटी कणीक, हिंग, पाव चमचा हळद, एक चमचा....

Read more