ठळक बातम्या तिखट भाकरी.    |     शेवभाजी.    |     मनाला शांती हवी असेल तर क्रोध आणि लोभापासून दूर राहावे.    |     कुटुंबातील मोठ्या लोकांच्या अनुभवातून आपण मोठमोठ्या अडचणींपासून दूर राहू शकते.    |     प्रगतीत अडथळा आणतात कार्यालयाशी संबंधित या गोष्टी.    |    

शेवभाजी

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: फेब्रुवारी 08, 2020 12:49 PM 2019-02-12T14:15:30+5:30

शेवभाजी

शहर : मुंबई

साहित्य -:

तिखट मध्यम जाड शेव १ वाटी, तिखट शेव बारीक वाटून १ लहान चमचा, १ मोठा कांदा, १ टोमॅटो मध्यम, सुक्या खोबऱ्याचे ३/४ वाटी उभे पातळ काप, ८ ते १० लसणाच्या पाकळ्या, आलं २ इंच, धणे १/२ लहान चमचा, जिरं १/२ लहान चमचा, शेवभाजी मसाला १ मोठा चमचा, लाल तिखट १/२ लहान चमचा, हळद १/४ लहान चमचा, कोथिंबीर चिरलेली २ मोठे चमचे, मीठ चवीनुसार, तेल २ मोठे चमचे (१ लहान चमचा तेल कांदा भाजायला), पाणी गरजेनुसार.

कृती- :

एका कढईत सुकं खोबरं, धणे व जिरे घालून मंद आचेवर लालसर होईपर्यंत भाजून घ्या आणि ताटात काढून ठेवा. कढईत १ लहान चमचा तेल घ्या व त्यात कापलेला कांदा घालून मंद आचेवर चांगला लालसर होईपर्यंत भाजून घ्या. मग गॅस बंद करून भाजलेला मसाला थंड करून घ्या. आता भाजलेला मसाला, आलं, लसूण, सर्व मिक्सरमध्ये घाला व थोडं पाणी घालून मिश्रण बारीक वाटून घ्या. मग कढईत तेल घेऊन ते तापल्यावर आच मध्यम करून त्यात वाटलेलं वाटण घालून तेल सुटेपर्यंत परतून घ्या. नंतर शेवभाजी मसाला, लाल तिखट, हळद व चवीनुसार मीठ घालून तेल सुटेपर्यंत खमंग परतवून घ्या. मग तिखट बारीक वाटलेली शेवपावडर घाला व मसाला एकजीव करुन घ्या. नंतर थोडंसं गरम पाणी घालून मिश्रण अजून एकजीव करा व २ ते ३ मिनिटं झाकण ठेवून द्या, म्हणजे मसाल्यातले तेल वर येईल (तरंगेल) मग गरजेनुसार गरम पाणी घालून व्यवस्थित ढवळून घ्या आणि रस्सा चांगला उकळू द्या.

रस्सा छान उकळला की त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर घाला व तिखट शेव घालून २ ते ३ मिनिटं उकळी घ्या आणि गॅस बंद करा... मस्त शेवभाजी तयार.

मागे

हरियाली चिकन
हरियाली चिकन

साहित्य अर्धा किलो चिकन, १ कप दही, २ कांदे, १ टोमॅटो, १ कप बारीक चिरलेली कोथिं....

अधिक वाचा

पुढे  

तिखट भाकरी
तिखट भाकरी

साहित्य -: पाव किलो बाजरी, पाव किलो ज्वारी, शंभर ग्रॅम गहू, सव्वाशे ग्रॅम चणा ....

Read more