ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

227 मतदार असेलेल्या गावात शून्य मतदानाची नोंद

By Dinesh Shinde | प्रकाशित: ऑक्टोबर 22, 2019 02:23 PM 2019-02-12T14:15:30+5:30

227 मतदार असेलेल्या गावात शून्य मतदानाची नोंद

शहर : यवतमाळ

केंद्र शासन, राज्य शासन, निवडणूक आयोगासह अनेक प्रतिष्ठितांनी आव्हान करून किंवा शर्थीचे प्रयत्न करून ही विधानसभा निवडणुकीत राज्यात 60 टक्क्याहून अधिक मतदान झाले नाही तर महागावच्या टोकाला असलेल्या थारकान्हा गावात 227 मतदारांनी मतदानावर बहिष्कार टाकल्याने शून्य मतदानाची येथील मतदान केंद्र क्रमांक 36 वर नोंद झाल्याचे उघडीस आले आहे.

थारकान्हा गावात मुळहुत सुविधांचा अभाव आहे. गावात रास्ते नाहीत. ग्रामस्थांनी यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडे पाठपुरावा केला पण काहीच उपयोग झाला नाही, म्हणून गावकर्‍यांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकला. तरीही त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्याने त्यांनी या विधानसभा निवडणुकीवर टाकला ही माहिती मिळताच निवडणूक अधिकार्‍यांनी जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे अबियंता प्रशांत ठमके व वीज वितरण  कंपनीचे अभियंता विनोद चव्हाण यांना त्या गावात पाठविले. त्यांच्या विनंतीलाही गावकर्‍यांनी मान दिला नाही कारण ते बहिष्काराच्या निर्णयावर ठाम होते.  

मागे

निवडणुकीच्या निकाला आधीच तीन उमेदवारांचा जल्लोष
निवडणुकीच्या निकाला आधीच तीन उमेदवारांचा जल्लोष

यावेळच्या विधानसभा निवडणुकीत अनेक लक्ष्यवेधक व आश्चर्यकारक घटना घडताना द....

अधिक वाचा

पुढे  

भविष्यात निवडणूक लढवणार नाही; हितेंद्र ठाकूर यांची घोषणा
भविष्यात निवडणूक लढवणार नाही; हितेंद्र ठाकूर यांची घोषणा

बहुजन विकास आघाडीचे (बविआ) सर्वेसर्वा आणि वसई-विरार मतदारसंघाचे आमदार हिते....

Read more