ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

अमित शाह यांना कोरोनाची लागण

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 02, 2020 06:22 PM 2019-02-12T14:15:30+5:30

अमित शाह यांना कोरोनाची लागण

शहर : देश

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाची  लागण झाल्याची बातमी खुद्द अमित शाह यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली. करोनाची प्राथमिक लक्षणं दिसत असल्याने चाचणी केली असता रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली. आता डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार अमित शाह रुग्णालयात दाखल होऊन उपचार घेणार आहेत.

ट्विट करत त्यांनी म्हटलं की,, 'करोनाची प्राथमिक लक्षणं दिसत असल्याने मी चाचणी केली असून रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. माझी प्रकृती ठीक आहे.' असं  देखील ते म्हणाले. शिवाया अमित शाह यांनी त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींना स्वतःची कोरोना चाचणी करण्याचे आवाहन केले आहे. त्याचप्रमाणे स्वतःला क्वारंटाईन करून घेण्याचा सल्ला देखील त्यांनी इतरांना दिला आहे.

 

पुढे  

मुख्यमंत्र्यांनी बोलवली मुंबई पोलीस आयुक्त, महासंचालक, मुख्य सचिवांची तातडीची बैठक
मुख्यमंत्र्यांनी बोलवली मुंबई पोलीस आयुक्त, महासंचालक, मुख्य सचिवांची तातडीची बैठक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई पोलीस आयुक्त, महासंचालक आणि मुख्य सचिव....

Read more