ठळक बातम्या शनिच्या अवकृपेपासून वाचण्यासाठी पिंपळवृक्षाखाली दिवा लावा!.    |     सूर्य देव कुंभात प्रवेश करेल, या राशींसाठी धन लाभाचे योग.    |     Magh Maas : पुण्य कमविण्यासाठी माघ महिन्याचे महत्त्व जाणून घ्या.    |     १०वी उत्तीर्णांसाठी संधी : लष्करात मेगा भरती.    |     पालकांनो इकडे लक्ष द्या, मुलांसाठी सॅनिटायझरचा वापर करताय !.    |    

२०१२ साली ११.७९ कोटींचे मालक असलेल्या शहांची आत्ताची संपत्ती तीन पटींनी वाढली ...

By GARJA ADMIN | प्रकाशित: एप्रिल 01, 2019 03:46 PM 2019-02-12T14:15:30+5:30

२०१२ साली ११.७९ कोटींचे मालक असलेल्या शहांची आत्ताची  संपत्ती तीन पटींनी वाढली ...

शहर : देश

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची संपत्ती गेल्या सात वर्षात तीन पटींनी वाढली असल्याचं समोर येतंय. गुजरातच्या गांधीनगर लोकसभा मतदार संघातून अमित शहा यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी सादर करण्यात आलेल्या आपल्या संपत्तीच्या माहितीवरून ही बाब समोर येतेय. अमित शहा यांनी दोन उमेदवारी अर्ज दाखल केल्याचंही समजतंय. उमेदवारी अर्जाची तपासणी बारकाईने होत असल्यामुळे जर एक अर्ज रद्द झाला तर दुसऱ्या अर्जाचा फायदा होतो.

अमित शहा यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात शहा आणि त्यांची पत्नी सोनल शाह यांची एकूण चल-अचल संपत्ती ३८.८१ कोटी इतकी दाखवली गेलीय. २०१२ साली ही संपत्ती ११.७९ कोटी होती. त्यामुळे गेल्या सात वर्षात ही संपत्ती तीन पटीने वाढली आहे. यात त्यांना वारसा हक्काने २३.४५ कोटी संपत्ती मिळाली असल्याचं नमूद करण्यात आलं. मात्र, अमित शाह यांच्याकडे स्वत:च्या मालकीची एकही कार नसल्याचं यात म्हटलं गेलंय. उल्लेखनीय म्हणजे, भाजप अध्यक्ष शाह यांच्या म्हणण्यानुसार, त्यांची वार्षिक कमाई ५३ लाख रुपये आहे. शाह यांच्या पत्नी सोनल शाह यांच्या नावावर ४.३६ करोडोंची संपत्ती आहे. २०१७ मध्ये त्यांच्याकडे ३.८८ कोटींची संपत्ती होती. त्यांच्याकडे एकूण २३.५५ कोटींचे दागिने आहेत.

२०१७ मध्ये राज्यसभेसाठी नामांकन दाखल करताना दिलेल्या शपथपत्रात शाह यांनी आपली संपत्ती ३४.३१ करोड रुपये असल्याचं सांगितलं होतं. २०१७ पासूनही शाह यांच्या संपत्तीत एकूण ४.५ करोड रुपयांची वाढ झालीय.

मागे

देश चालवायला ५६ इंची छाती हवी ५६ पक्ष नाही, मुख्यमंत्र्यांकडून विरोधकांची खिल्ली
देश चालवायला ५६ इंची छाती हवी ५६ पक्ष नाही, मुख्यमंत्र्यांकडून विरोधकांची खिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हरविण्यासाठी महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्र....

अधिक वाचा

पुढे  

एक आणि एक अकरा की चौकीदारांचा बकरा? मनसेच आशिष शेलारांना चोख प्रत्युत्तर
एक आणि एक अकरा की चौकीदारांचा बकरा? मनसेच आशिष शेलारांना चोख प्रत्युत्तर

मुंबई- निवडणुका जवळ येऊ लागल्यानं राजकीय पक्षांची प्रचाराची रंगत वाढत चालल....

Read more