ठळक बातम्या शनिच्या अवकृपेपासून वाचण्यासाठी पिंपळवृक्षाखाली दिवा लावा!.    |     सूर्य देव कुंभात प्रवेश करेल, या राशींसाठी धन लाभाचे योग.    |     Magh Maas : पुण्य कमविण्यासाठी माघ महिन्याचे महत्त्व जाणून घ्या.    |     १०वी उत्तीर्णांसाठी संधी : लष्करात मेगा भरती.    |     पालकांनो इकडे लक्ष द्या, मुलांसाठी सॅनिटायझरचा वापर करताय !.    |    

'खडसेंच्या विधानाने तळपायाची आग मस्तकात', अंजली दमानिया संतापल्या, खडसेंना उत्तर देणार

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 22, 2020 01:06 PM 2019-02-12T14:15:30+5:30

'खडसेंच्या विधानाने तळपायाची आग मस्तकात', अंजली दमानिया संतापल्या, खडसेंना उत्तर देणार

शहर : मुंबई

राज्याच्या राजकारणातील मोठं नाव असलेले एकनाथ खडसे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना जबाबदार धरत बुधवारी भाजपला राम-राम ठोकला. त्यावेळी त्यांनी एका विनयभंगाच्या प्रकरणाचा उल्लेख करत फडणवीसांवर जोरदार हल्ला चढवला. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी खडसेंवर विनयभंगाचा आरोप केला होता आणि फडणवीसांच्या सांगण्यावरुनच आपल्यावर गुन्हा दाखल झाल्याचा गंभीर आरोप एकनाथ खडसे यांनी केलाय. खडसेंच्या या आरोपांवर आता अंजली दमानिया चांगल्याच संतापल्या आहेत.

एकनाथ खडसे यांनी काल पत्रकार परिषदेत माझ्याबद्दल काही वक्तव्य केलं. यावर मी न बोलण्याचा निर्णय घेतला. कारण तेव्हा मी घरी नव्हते आणि खडसे नेमकं काय म्हणाले हे मी प्रत्यक्षात ऐकले नव्हते. पण रात्री जेव्हा मी ते ऐकलं तेव्हा तळपायाची आग मस्तकात गेली. आज पुन्हा त्यांनी माध्यमांशी बोलताना माझ्याबद्दल अतिशय घृणास्पद वक्तव्य केलं आहे. आज दुपारी 4.30 वाजता या विषयावर मुंबई मराठी पत्रकार संघात पत्रिकार परिषद घेणार आहे, अशी प्रतिक्रिया दमानिया यांनी दिली आहे.

एकनाथ खडसे यांचे फडणवीसांवर गंभीर आरोप

अंजली दमानिया यांनी माझ्यावर विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल केला. त्यावेळी पोलिस गुन्हा दाखल करण्यासाठी तयार नव्हते. पण फडणवीस यांच्या सांगण्यावरुनच माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला, असा गंभीर आरोप एकनाथ खडसे यांनी केला आहे. ‘माझ्यावर भ्रष्टाचाराचे अनेक खोटे आरोप करण्यात आले. पण कोणत्याही राजकीय पक्षानं माझ्या राजीनाम्याची किंवा चौकशीची मागणी केली नव्हती. पण एकट्या फडणवीसांमुळे मला मनस्ताप सहन करावा लागला. फडणवीसांमुळेच आपण पक्ष सोडतो आहोत, अशी उद्विग्न प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.

खडसेंच्या आरोपांना फडणवीस योग्य वेळी उत्तर देणार

अंजली दमानिया यांनी आपल्यावर खोटा आरोप केला आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरुन पोलिसांनी आपल्यावर गुन्हा दाखल केल्याचा गंभीर आरोप एकनाथ खडसे यांनी केला आहे. त्यावर देवेंद्र फडणवीस यांना विचारलं असता, अशा वेळी कुणाला तरी विलन करावं लागतं आणि खडसेंनी मला विलन केलं आहे. खडसेंच्या आरोपांना योग्य वेळी उत्तर देईल, अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली आहे.

मागे

...आणि मुक्ताईनगरच्या कार्यालयावर 40 वर्षांपासून असलेली भाजपची ओळख एका रात्रीत नाहिशी
...आणि मुक्ताईनगरच्या कार्यालयावर 40 वर्षांपासून असलेली भाजपची ओळख एका रात्रीत नाहिशी

तब्बल चार दशकांपासून भाजपमध्ये असलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी बुधवा....

अधिक वाचा

पुढे  

CBI च्या क्षमतेवर शंका नाही, पण राजकीय हस्तक्षेपामुळे महाराष्ट्रात नो एण्ट्री : गृहमंत्री
CBI च्या क्षमतेवर शंका नाही, पण राजकीय हस्तक्षेपामुळे महाराष्ट्रात नो एण्ट्री : गृहमंत्री

सीबीआय ही अत्यंत प्रोफेशनली काम करणारी संस्था आहे, पण त्यांचा वापर राजकीय प....

Read more