ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर चाकू हल्ला

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 16, 2019 01:04 PM 2019-02-12T14:15:30+5:30

शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर चाकू हल्ला

शहर : मुंबई

शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर चाकू हल्ला झाला आहे. उस्मानाबादच्या नायगाव पाडोळीत हा हल्ला झाला. हल्लेखोर वार करून फरार झालाय आहे. उस्मानाबाद - कळंब मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार कैलास पाटील यांच्या प्रचारासाठी खासदार ओमराजे निंबाळकर आले होते. त्यावेळी गाडीतून उतरता क्षणी हल्लेखोरानं वार केला.

ओमराजेंना गंभीर दुखापत झालेली नाही, मात्र त्यांच्या घड्याळावर आणि हातावर जखम झाली आहे. हल्लेखोर बंडखोर आहे की विरोधकांमधील आहे हे समजू शकलेलं नाही. पाडोळी गावातल्या अजिंक्य टेकाळे तरुणानं हा हल्ला केल्याचं समजतं आहे. पण त्याने हा हल्ला का केला, याबाबत अजून माहिती मिळालेली नाही. हा हल्लेखोर वार करून फरार झाला आहे.

मी सुखरुप आहे, तसंच कार्यकर्त्यांनी शांतता बाळगावी, असं आवाहन ओमराजे निंबाळकर यांनी केलं आहे. दरम्यान या घटनेनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. हल्ला झाल्यानंतर गावात तणावाचं वातावरण आहे. हल्ला झाला त्या ग्रामपंचायतीत शिवसेनेची सत्ता आहे.

 

मागे

ED मुळे लाव रे तो व्हिडिओ बंद झाला? राज ठाकरेंनी दिलं उत्तर
ED मुळे लाव रे तो व्हिडिओ बंद झाला? राज ठाकरेंनी दिलं उत्तर

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या आपल्या पक्षासाठी महाराष्ट्रभर प्रचारसभा घ....

अधिक वाचा

पुढे  

अजून मतदानच नाही, मात्र मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलीत या  मंत्र्यांची नावं!
अजून मतदानच नाही, मात्र मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलीत या मंत्र्यांची नावं!

विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता शेवटच्या टप्प्यात आलाय. प्रचाराची रणधुमाळ....

Read more