ठळक बातम्या शनिच्या अवकृपेपासून वाचण्यासाठी पिंपळवृक्षाखाली दिवा लावा!.    |     सूर्य देव कुंभात प्रवेश करेल, या राशींसाठी धन लाभाचे योग.    |     Magh Maas : पुण्य कमविण्यासाठी माघ महिन्याचे महत्त्व जाणून घ्या.    |     १०वी उत्तीर्णांसाठी संधी : लष्करात मेगा भरती.    |     पालकांनो इकडे लक्ष द्या, मुलांसाठी सॅनिटायझरचा वापर करताय !.    |    

कॉंग्रेसचे जेष्ठ नेते, माजीमंत्री बी. जे. खताळ-पाटील यांचे निधन

By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 16, 2019 11:16 AM 2019-02-12T14:15:30+5:30

कॉंग्रेसचे जेष्ठ नेते, माजीमंत्री बी. जे. खताळ-पाटील यांचे निधन

शहर : अहमदनगर

कॉंग्रेसचे जेष्ठ नेते आणि माजी मंत्री बी.जे. खताळ-पाटील यांचे आज पहाटे सव्वा दोनच्या सुमारास संगमनेर येथील राहत्या घरी निधन झाले. ते 101 वर्षाचे होते. आज दुपारी 4 वाजता खताळ-पाटील यांच्या पार्थिव देहावर प्रवरा नदी तिरावरील अमरधाम येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

खताळ-पाटील यांचा जन्म 16 मार्च 1919 रोजी संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येथे झाला. सन 1943 ते 1962 या काळात त्यांनी नामांकित वकील म्हणून नावलौकिक मिळविला. गांधीजींनी ब्रिटीशांविरोधात पुकारलेल्या 'चले जाव' चळवळीत त्यांचा सहभाग होता. 1958 मध्ये संगमनेर सहकारी साखर कारखाना उभारणीची संकल्पना घेऊन कारखान्याचे मुख्य प्रवर्तक म्हणून त्यांनी कामाला सुरवात कली.

1969 मध्ये प्रत्यक्ष कारखाना सुरू झाला. 1962 ते 1980 अशा 4 विधानसभा निवडणुका कॉंग्रेस पक्षाच्या माध्यमातून त्यांनी संगमनेर मतदारसंघातून त्यांनी जिंकल्या. त्या काळात राज्यमंत्री मंडळात सहकार, नियोजन, महसूल, कायदा व न्याय, अन्न व नागरी पुरवठा, सार्वजनिक बांधकाम, पाटबंधारे आदि खात्यांचा कारभार त्यांनी पाहिला. वयाच्या 93 व्या वर्षी त्यांनी लिहायला सुरवात केली. त्यांनी 7 पुस्तके लिहिली आहेत.

 

 

 

 

 

 

पुढे  

धनगर समाजाच्या विकासासाठी निधी दिल्याबद्दल डॉ. संजय कुटे यांचा सत्कार
धनगर समाजाच्या विकासासाठी निधी दिल्याबद्दल डॉ. संजय कुटे यांचा सत्कार

धनगर समाजाच्या विकासासाठी 1 हजार कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल....

Read more