By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 18, 2020 04:09 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : बेळगाव
बेळगाव - शिवसेनेचे खासदार संजय राउत यांना बेळगाव विमानतळावर पोहोचताच पोलिसांनी ताब्यात घेतले. या विमानतळावर त्यांच्या आगमनाची माहिती मिळताच मोठ्या संख्येने मराठी भाषिक आणि शिवसैनिक एकवटले होते. त्यांच्या स्वागतासाठी मोठा जमाव पाहता चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तसेच राउत यांचा प्रवेश होताच पोलिसांनी आपल्यासोबत नेले.
या दरम्यान, राउत यांच्यासोबत शिवसेनेचे कार्यकर्ते देखील उपस्थित होते. अवघ्या 20 मिनिटे चौकशी केल्यानंतर राउत यांना सोडण्यात आले. यानंतर राउत थेट कार्यक्रमाच्या ठिकाणी रवाना झाले. संजय राउत यांना बेळगाव पोलिसांनी मॅरिएट हॉटेलमध्ये थांबण्याची विनंती केली. ही विनंती राउत यांनी मान्य केली आणि शनिवारचा दिवस ते बेळगावात मुक्काम करणार आहेत.
Shiv Sena MP Sanjay Raut: Policemen are escorting me and are taking me to an unknown destination from Belgaum Airport. #Karnataka https://t.co/hVqLEhHN5r
— ANI (@ANI) January 18, 2020
दरम्यान, या दौऱ्यापूर्वी माध्यमांशी संवाद साधताना संजय राउत म्हणाले होते, की "बांग्लादेशी, पाकिस्तानी आणि रोहिंग्या सुद्धा भारतात प्रवेश करू शकतात. परंतु, महाराष्ट्रातून कुणीही बेळगावला जाऊ शकत नाही. हे अतिशय चुकीचे आहे. आम्ही सगळेच भारतीय आहोत. निर्बंध असू द्या... मी त्या ठिकाणी जाणार आणि तेथील लोकांशी एका कार्यक्रमाच्या माध्यमातून संवाद साधणार आहे."
नवी दिल्ली - केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांनी ....
अधिक वाचा