ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

विधानसभा निवडणुकीत 'या' बड्या नेत्यांना पराभवाचा धक्का

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 24, 2019 03:52 PM 2019-02-12T14:15:30+5:30

विधानसभा निवडणुकीत 'या' बड्या नेत्यांना पराभवाचा धक्का

शहर : मुंबई

विधानसभा निवडणुकीच्या गुरुवारी जाहीर झालेल्या निकालांमध्ये राज्यातील अनेक बड्या नेत्यांना पराभवाचा धक्का बसला. आतापर्यंत जाहीर झालेल्या निकालांनुसार भाजप १०३, शिवसेना ५९, काँग्रेस ४२, राष्ट्रवादी काँग्रेस ५५ आणि इतर उमेदवार २९ जागांवर आघाडीवर आहेत.

त्यामुळे शिवसेना-भाजपने बहुमताचा आकडा गाठला असला तरी महायुती २०० च्या आकड्यापर्यंत पोहोचणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. १६४ जागा लढवणाऱ्या भाजपला १०० जागांपर्यंतच समाधान मानावे लागू शकते. तर दुसरीकडे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने आपली ताकद दाखवून दिली आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात महायुतीच्या अनेक बड्या नेत्यांना पराभवाचा धक्का बसला.

१. परळी विधानसभा मतदारसंघात विद्यमान मंत्री पंकजा मुंडे यांचा राष्ट्रवादीच्या धनंजय मुंडे यांनी पराभव केला.

२. कर्जत-जामखेड मतदारसंघात पहिल्यांदाच विधानसभेच्या रिंगणात उतरलेल्या रोहित पवार यांनी मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय आणि भाजपचे मंत्री राम शिंदे यांना पराभवाची धूळ चारली.

३. जालनामधून काँग्रेसचे उमेदवार कैलास गोरंट्याल यांनी शिवसेनेचे उमेदवार व राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांचा पराभव केला.

४. मुक्ताईनगर मतदारसंघातून एकनाथ खडसे यांची कन्या रोहिणी खडसे यांचा शिवसेनेचे बंडखोर उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी धक्कादायक पराभव केला.

५. ठाकरे घराण्याचे निवासस्थान असलेल्या वांद्रे पूर्व मतदारसंघातून महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले. तृप्ती सावंत यांच्या बंडखोरीमुळे याठिकाणी काँग्रेसचे झिशान सिद्दीकी निवडून आले.

६. पुरंदर मतदारसंघातून विजय शिवसेनेचे शिवतारे पराभूत

७. रायगडच्या श्रीवर्धन मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या अदिती तटकरे यांनी शिवसेनेचे वजनदार नेते विनोद घोसाळकर यांचा पराभव केला.

८. चिपळूण मतदारसंघात शिवसेनेचे विद्यमान आमदार सदानंद चव्हाण यांचा राष्ट्रवादीच्या शेखर निकम यांच्याकडून पराभव.

९. खेड-दापोली मतदारसंघातून राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार संजय कदम यांचा पराभव. पर्यावरणमंत्री रामदास कदम याचे पूत्र योगेश कदम विजयी.

१०. उरणध्ये भाजपचे बंडखोर उमेदवार महेश बालदी यांनी शिवसेनेच्या मनोहर भोईर यांचा पराभव केला.

११. अलिबागमध्ये शेकापचे उमेदवार पंडित पाटील यांना शिवसेनेच्या महेंद्र दळवी यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला.

१२. मीरा-भाईंदरमध्ये भाजपच्या नरेंद्र मेहता यांना बंडखोर उमेदवार गीता जैन यांनी पराभवाची धूळ चारली.

१३. इंदापूर मतदारसंघात भाजपच्या हर्षवर्धन पाटील यांना पराभवाचा धक्का

मागे

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंना राजकीय जीवनातला सर्वात मोठा धक्का
भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंना राजकीय जीवनातला सर्वात मोठा धक्का

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना त्यांच्या राजकीय जीवनातला हा सर्वात म....

अधिक वाचा

पुढे  

शरद पवारांच्या प्रबळ इच्छाशक्तीचं सोशल मीडियावर कौतुक
शरद पवारांच्या प्रबळ इच्छाशक्तीचं सोशल मीडियावर कौतुक

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल आतापर्यंत स्पष्ट झाला आहे. 2014 पेक्षा 20....

Read more