ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांचा भाजपात प्रवेश

By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 31, 2019 02:45 PM 2019-02-12T14:15:30+5:30

कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांचा भाजपात प्रवेश

शहर : मुंबई

गेले काही दिवस कॉंग्रेस राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दिग्गज नेते भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा होत होती. लवकरच होणार्‍या विधानसभा निवडणुकीआधीच आज राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सातारा जावळीचे आमदार शिवेंद्रराजे भोसलें एरोलीचे संदीप नाईक, अकोलाचे वैभव पिचड आणि मुंबईतील वडाळाचे कॉंग्रेसचे आमदार कालिदास कोळंबकर यांनी आज भाजप मध्ये प्रवेश केला.

मुंबईतील गरवारे क्लब हाऊस मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपात प्रवेश करणार्‍या कॉंग्रेस राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या दिग्गज नेत्याचे स्वागत केले. यावेळी भाजपात प्रवेश करणार्‍यांमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे विश्वासू माजी मंत्री मधुकर पिचड, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला अध्यक्षा चित्रा वाघ, महात्मा फुले यांच्या वंशज नीताताई घुले , सातार्‍याचे 11 नगरसेवक आदींचा समावेश आहे.  

मागे

गणपतराव देशमुख यंदा निवडणूक लढविणार नाहीत.
गणपतराव देशमुख यंदा निवडणूक लढविणार नाहीत.

सोलापूर जिल्ह्यातील सांगोला विधानसभा मतदारसंघातून तब्बल 11 वेळा विजयी झाले....

अधिक वाचा

पुढे  

विश्वेश्वर हेगडे कर्नाटक विधानसभा अध्यक्षपदी
विश्वेश्वर हेगडे कर्नाटक विधानसभा अध्यक्षपदी

सिरसी विधानसभा मतदार संघाचे सहा वेळा आमदार आणि भाजपचे ज्येष्ठ नेते विश्वेश....

Read more