ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

लोकसभेनंतर राज्यसभेतही भाजपची बहुमताच्या दिशेने वाटचाल

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जून 20, 2019 08:36 PM 2019-02-12T14:15:30+5:30

लोकसभेनंतर राज्यसभेतही भाजपची बहुमताच्या दिशेने वाटचाल

शहर : देश

लोकसभा निवडणुकीत मोठ्या विजयानंतर ही भाजपकडे राज्यसभेत बहुमत नाही. त्यामुळे तीन तलाक विरोधी विधेयक सारखे अनेक विधेयकं राज्यसभेत पास होऊ शकलेले नाही. पण आता टीडीपीचे राज्यसभा खासदार भाजपमध्ये आल्याने एनडीए आणखी मजबूत झाली आहे.

टीडीपीचे राज्यसभेत खासदार होते. पण खासदार भाजपमध्ये आल्याने भाजपची राज्यसभेतील संख्या ७१ वरुन ७५ झाली आहे. महत्त्वाचं म्हणजे टीडीपीच्या / खासदारांनी भाजपमध्ये प्रवेश करत विलिनीकरणाचा प्रस्ताव दिल्याने ते राज्यसभेचे सदस्य राहणार आहेत.राज्यसभेत एकूण २४५ सदस्य आहेत. एनडीएकडे १९९ सदस्य आहेत. बहुमतासाठी १२३ जागांची गरज असते. एनडीएकडे अजूनही २३ जागा कमी आहेत. काँग्रेसकडे राज्यसभेत ४८ तर टीएमसीकडे १३ खासदार आहेत.

राज्यसभेत एनडीएचं संख्याबळ

भाजप- ७१

अन्नाद्रमुक- १३

जदयू- ०६

अकाली दल- ०३

शिवसेना- ०३

नॉमिनेटेड- ०३

आरपीआय- ०१

२०२० पर्यंत मिळणार बहुमत

बिहार आणि गुजरातमध्ये राज्यसभेच्या जागांवर निवडणूक होणार आहे. रविशंकर प्रसाद, अमित शाह आणि स्मृती इराणी हे लोकसभेचे खासदार झाल्याने या जागा रिक्त झाल्या आहेत. या ही जागा भाजपला मिळणार आहेत. यूपीमध्ये १० जागांवर निवडणूक होणार आहे. ज्यामध्ये भाजपला अधिक जागा मिळतील. जागा या सध्या विरोधकांकडे आहेत. सपाकडे , बसपाकडे आणि काँग्रेसकडे जागा आहे.

बीजेडी आणि वायएसआर काँग्रेस हे भाजपच्या बाजुने उभे राहतील ही शक्यता आहे. तक काही पक्ष वॉक आऊट करुन जाऊ शकतात. ज्याचा फायदा भाजपलाच होईल. त्यामुळे लोकसभेनंतर राज्यसभेतही भाजप मजबूत होईल.

मागे

चंद्रबाबू नायडू लंडनमध्ये आणि टीडीपीचे 4 खासदार भाजपात
चंद्रबाबू नायडू लंडनमध्ये आणि टीडीपीचे 4 खासदार भाजपात

टीडीपीच्या वाय.एस.चौधरी, टी.जी व्यंकटेश, सी.एम रमेश आमि जी मोहन राव यांनी उपरा....

अधिक वाचा

पुढे  

योगींच्या मंत्र्याची पादत्राणं सरकारी कर्मचाऱ्याच्या हातात
योगींच्या मंत्र्याची पादत्राणं सरकारी कर्मचाऱ्याच्या हातात

उत्तरप्रदेशच्या शाहजहांपूरमध्ये योग दिवसाला कॅबिनेट मंत्री लक्ष्मी नारा....

Read more