ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

घोटाळेबाज प्रताप सरनाईकांचं ठाकरे सरकार संरक्षण करतंय, किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 27, 2020 11:16 AM 2019-02-12T14:15:30+5:30

घोटाळेबाज प्रताप सरनाईकांचं ठाकरे सरकार संरक्षण करतंय, किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप

शहर : मुंबई

ठाकरे सरकार घोटाळेबाज आमदार प्रताप सरनाईकांचं संरक्षण करतंय, असा गंभीर आरोप भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला. प्रताप सरनाईक यांनी कोट्यवधी रुपयांचा लाच घेतल्याचा सणसणीत आरोप सोमय्या यांनी केला.

टॉप्स ग्रुपकडून MMRDA ला 175 कोटींच्या कंत्राटासाठी 7 कोटींची लाच दिल्याची माहिती समोर येत आहे. ईडीच्या चौकशीतून काही धक्कादायक बाबी उघडकीस येत आहेत. याप्रकरणी 28 ऑक्टोबर 2020 रोजी खासगी एफआयआर नोंदविला गेला. परंतु एमएमआरडीए, मुंबई पोलिस, ठाकरे सरकार यांनी अद्याप ही चौकशी सुरु केली नाही, असं सोमय्या म्हणाले.

टॉप्स सिक्युरिटीचे माजी कर्मचारी रमेश अय्यर यांनी 28 ऑक्टोबरला तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीनंतर मुंबई पोलिसांनी एफआयआर दाखल केला होता. त्यानंतर ईडीचे अधिकारी आता त्याबाबतचा तपास करत आहेत. मात्र ठाकरे सरकारला घोटाळेबाज प्रताप सरनाईकांना वाचवायचं आहे, अशी टीका सोमय्या यांनी केली. तर गेल्या अनेक वर्षांपासून सोमय्या हफ्ते घेतल्याचा सनसनाटी आरोप देखील सोमय्या यांनी केलाय.

टॉप्स ग्रुप प्रकरणात मोठ्या प्रमाणात पैशांचा गैरव्यवहार झाल्याचं लक्षात आल्यानंतर ईडीनं शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांचे व्यावसायिक भागीदार अमित चांदोळे यांना अटक करून 29 नोव्हेंबरपर्यंत कोठडी सुनावली. चांदोळे तीन दिवस ईडीच्या ताब्यात राहणार असून, त्यांची ईडीकडून कसून चौकशी केली जाणार आहे. या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच चांदोळे यांना न्यायालयाने कोठडी सुनावल्याने हा सरनाईक यांच्यासाठी मोठा झटका असल्याचं मानलं जात आहे. अमित चांदोळे यांनी ईडीच्या चौकशीमध्ये रोख रक्कम स्वीकारली असल्याचे मान्य केले होते. ईडीच्या अधिकाऱ्यांनी यापूर्वी केलेल्या तपास आणि साक्षीमधून शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचे नाव समोर आले होते.

अमित चांदोळे हे प्रकरणातील मुख्य सूत्रधार आहेत. टॉप सिक्युरिटीचे मालक राहुल नंदा यांना कंत्राट मिळवून देण्यात अमित चांदोळेंची महत्त्वाची भूमिका होती. त्यात अमित चांदोळेंना लाचेच्या स्वरूपात काही रक्कमही मिळत असल्याचा गौप्यस्फोट ईडीच्या तपासातून उघड झाला आहे. गेल्या चार ते पाच वर्षांमध्ये MMRDAकडून जवळपास 350 ते 500 गार्डचं कंत्राट मिळालं होतं.

राहुल नंदा यांच्या टॉप्स सिक्युरिटीकडून 100 पैकी फक्त 70 टक्के गार्ड्स वापरले जायचे. 30 टक्के गार्ड्सचा वापर केला जात नव्हता. म्हणजेच जवळपास 150च्या आसपास गार्ड्स वापरले जात नव्हते. मात्र त्याची रक्कम सगळी टॉप्सच्या ग्रुपला मिळत होती. त्यातील काही रक्कम लाच म्हणून अमित चांदोळे आणि संकेत मोरे यांना मिळत असल्याचीही माहिती तपासातून उघड झाली आहे.        

मागे

'राज्यात दोन महिन्यात भाजपची सत्ता येणार', रावसाहेब दानवेंचा दावा
'राज्यात दोन महिन्यात भाजपची सत्ता येणार', रावसाहेब दानवेंचा दावा

महाराष्ट्रात सत्तांतरासाठी जुळवाजुळव पूर्ण झाली असून दोन महिन्यात भाजपची....

अधिक वाचा