ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

"महाशिवआघाडीतून ‘शिव’ काढलं ना, मग आता त्याप्रमाणेच वागा" - उदयनराजे भोसले 

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 14, 2020 03:21 PM 2019-02-12T14:15:30+5:30

शहर : मुंबई

       पुणे -  'आज के शिवाजी - नरेंद्र मोदी' हे पुस्तक अतिशय वादग्रस्त ठरलं आहे. भाजपाच्या दिल्लीतील कार्यालयात प्रकाशित झालेल्या या पुस्तकात मोदी आणि छत्रपती शिवरायांची तुलना करण्यात आल्यानं सर्वच स्तरावरून टीका करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज हे युग पुरुष आहेत. असा युग पुरुष एकदाच जन्माला येतो. त्यांची ऊंची कोणीही करू शकत नाही. युगपुरुष हा एकदाच जन्माला येतो आणि ते म्हणजे शिवजीराजे. मात्र अलीकडे ‘जाणता राजा’ ही उपमाही दिली जाते. मी याचा निषेद करतो. त्या सो कॉल्ड...जाणत्या राजांना ही उपमा कुणी दिली माहीत नाही, अशी टीका भाजपचे नेते, सातारचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना अचूक लक्ष वेधत केली.

            मी पुस्तक वाचलेले नाही, मात्र ऐकायला मिळाले त्याबद्दल वाईट वाटलं. मी राजकारण करणार नाही, पण त्यांची तुलना केली जाते हीच सगळ्यात वाईट गोष्ट आहे. तुलना होऊ शकत नाही, पण आपल्या देशातील योध्याचे आपण अनुकरण करु शकतो, त्यांच्यासारखं होण्याचा प्रयत्न करू शकतो. महाराजांच्या घराण्यात माझा जन्म झाला आहे याचा मला अभिमान आहे, पण मी वंशज म्हणून त्यांच्या नावाचा दुरुपयोग केला नाही, असेही उदयनराजे म्हणाले.   

          कोणीतरी बिन पट्याच रस्त्यावर फिरणारं असं लिहितो, त्याची लायकी मी दाखवून देणार आहे. कोणीतरी म्हणत होतं की, महाराजांच्या वंशजांना विचारा, शिवसेना काढली तेव्हा वंशजांना विचारायले आला होता का? महाशिवआघाडीतून ‘शिव’ काढलं ना, मग आता त्याप्रमाणेच वागा. सोयीप्रमाणे नावाचा वापर करणे  ही कुठली पद्धत? खासदार की बिसदार की सोडा, मी मनाला पटलं ते करतो. टीका करणाऱ्यांनी लक्षात ठेवा तुम्ही वेळ संपत आली आहे.

         दादरच्या शिवसेना भवनावरील चित्रात महाराज कुठे पाहिजे होते, आणि कुठे आहेत? वंशज म्हणून आम्ही कधी सत्तेसाठी कुत्र्यासारखे मागे भटकलो नव्हतो. सत्तेस्थानी असलेल्या सो कॉल्डने... अजूनही आरक्षणाचा प्रश्न, शेतकऱ्यांचा प्रश्न न सोडवता ह्यांना हॉटेलची पळवापळवीच सुटता सुटेनाशी झालेली. अरबी समुद्रातील स्मारकाचं काय झालं, हे लोक स्वार्थासाठी एकत्र येतात आणि स्वार्थ साधला की दूर होतात. महाराज भोसलेंचे राजे नव्हते तर रयतेचे राजे होते, असेही त्यांनी शिवसेनेला ठणकावले.

    

मागे

नाशिक पालिका पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव
नाशिक पालिका पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव

      नाशिक - नाशिक महापालिकेच्या दोन जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत स....

अधिक वाचा

पुढे  

नवाब मलिकांचे भाऊ कप्तान मलिकांची कामगारांना मारहाण
नवाब मलिकांचे भाऊ कप्तान मलिकांची कामगारांना मारहाण

      मुंबई - राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांचे बंधू नगरसेवक क....

Read more