ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

उत्तर मुंबई भाजपच्या अल्पसंख्याक सेलचा अध्यक्ष चक्क बांगलादेशी, सचिन सावंतांचा भाजपवर हल्लाबोल

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: फेब्रुवारी 20, 2021 11:14 AM 2019-02-12T14:15:30+5:30

उत्तर मुंबई भाजपच्या अल्पसंख्याक सेलचा अध्यक्ष चक्क बांगलादेशी, सचिन सावंतांचा भाजपवर हल्लाबोल

शहर : मुंबई

भाजपचा उत्तर मुंबई अल्पसंख्यांक सेलचा (BJP Minority Cell) प्रमुख चक्क बांगलादेशी नागरिक निघालाय. भाजपचाच पदाधिकारी बांगलादेशी निघाल्यानंतर काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपची जोरदार कोंडी केलीय. तसेच हा भाजपचा संघजिहाद आहे का? असा सवाल उपस्थित केलाय. भाजपचे पदाधिकारी गोमातेची तस्करी करताना पकडले गेले, काहीजण तर पाकिस्तानच्या आयएसआयचे एजंट निघाले. आता भाजपची प्रगती त्याच्याही पुढे झाल्याचा टोलाही सचिन सावंत यांनी लगावला. या प्रकरणानंतर भाजपने संबंधित पदाधिकाऱ्याला पदावरुन हटवलं आहे (BJP Minority cell chief found as a Bangladesh citizen Congress attack BJP).

सचिन सावंत म्हणाले, “भारतीय जनता पक्षाचे काही पदाधिकारी गोमातेची तस्करी करताना पकडले गेले तर काहीजण पाकिस्तानी आयएसआयचे एजंट निघाले. हे सर्व आपल्यासमोर असताना भाजपची प्रगती त्याच्याही पुढे झाली आहे. आता उत्तर मुंबई भाजपच्या अल्पसंख्याक सेलचा अध्यक्ष चक्क बांग्लादेशी नागरिक रुबेल शेख निघाला. भाजपात ‘संघजिहाद ही नवीन पद्धत सुरु झाली आहे का आणि सीएए कायद्यात भाजपासाठी काही वेगळे प्रावधान केले आहे का? याचे उत्तर भाजपाने दिले पाहिजे.”

“मुंबईमध्ये बेकायदेशीररीत्या घुसखोरी करून राहणाऱ्या बांग्लादेशी नागरिक रुबेल शेखला भाजपच्या पदावर नियुक्ती केली जाते. दुसरीकडे सीएए कायद्याचा धाक दाखवला जात आहे. भाजपचं हे वागणं म्हणजे देश पातळीवर वेगळा न्याय आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांना वेगळा न्याय असं दिसते. भाजपमध्ये तर वाल्याचा वाल्मिकी होतो. ही नवीन पद्धती भाजपने सुरु केली आहे काय? याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे,” असंही सचिन सावंत यांनी विचारलं.

मागे

…तर दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला महाराष्ट्रातून बळ देऊ, नाना पटोले अ‍ॅक्शन मोडमध्ये
…तर दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला महाराष्ट्रातून बळ देऊ, नाना पटोले अ‍ॅक्शन मोडमध्ये

“मोदी सरकारने काळे कृषी कायदे रद्द करावेत या मागणीसाठी लाखो शेतकरी अडीच म....

अधिक वाचा

पुढे  

राममंदिरासाठी ‘चंदा वसुली’ करण्यापेक्षा पेट्रोल-डिझेलचे भाव खाली आणा, सामनातून मोदींवर हल्लाबोल
राममंदिरासाठी ‘चंदा वसुली’ करण्यापेक्षा पेट्रोल-डिझेलचे भाव खाली आणा, सामनातून मोदींवर हल्लाबोल

“लोकांना जगण्याचा हक्क आहे व त्यातही जीवनावश्यक गोष्टींचे भाव नियंत्रित ....

Read more