ठळक बातम्या शनिच्या अवकृपेपासून वाचण्यासाठी पिंपळवृक्षाखाली दिवा लावा!.    |     सूर्य देव कुंभात प्रवेश करेल, या राशींसाठी धन लाभाचे योग.    |     Magh Maas : पुण्य कमविण्यासाठी माघ महिन्याचे महत्त्व जाणून घ्या.    |     १०वी उत्तीर्णांसाठी संधी : लष्करात मेगा भरती.    |     पालकांनो इकडे लक्ष द्या, मुलांसाठी सॅनिटायझरचा वापर करताय !.    |    

भाजपाचा हाच युतीधर्म आहे का? शिवसेनेविरोधातील भाजप बंडखोरांवर कारवाई करा

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 11, 2019 04:09 PM 2019-02-12T14:15:30+5:30

भाजपाचा हाच युतीधर्म आहे का? शिवसेनेविरोधातील भाजप बंडखोरांवर कारवाई करा

शहर : मुंबई

विधानसभा निवडणुकीत भाजप उमेदवाराच्या विरोधात बंडखोरी करणाऱ्यांवर भाजपने कारवाई केली. मात्र शिवसेना उमेदवारांच्या विरोधात रिंगणात उतरलेल्या भाजपा बंडखोरांवर मात्र अजूनही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे भाजपने युतीच्या धर्माचं पालन करावं असा सल्ला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिला आहे.तुमसरचे बंडखोर उमेदवार चरण वाघमारे, मीरा भाईंदरच्या गीता जैन, चिंचवडमधून बंडखोरी केलेले बाळासाहेब ओव्हाळ आणि लातूरच्या अहमदपूरचे दिलीप देशमुख यांना प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पक्षातून बडतर्फ केले. तर बंडखोरी केलेले पालघर जिल्हा सरचिटणीस संतोष जनाठे यांनी आपणहून राजीनामा दिला. मात्र, शिवसेना उमेदवाराविरोधात रणशिंग फुंकलेल्यांवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. भाजपाचा हाच युतीधर्म आहे का, असा सवाल यामुळे उपस्थित झाला आहे.

भाजपचे बंडखोर उमेदवार बाळासाहेब सानप यांनी शुक्रवारी संजय राऊत यांची भेट घेतली. नाशिक पूर्व मतदारसंघात बाळासाहेब सानप विरुद्ध राहुल ढिकले समोरासमोर उभे ठाकल्याने मुंडे वंजारी विरुद्ध मराठा समाजात वाद पेटला आहे. या माध्यमातून ग्रामीण भागातील वंजारी समाजाची मते सांभाळण्याचा प्रयत्न शिवसेनेतर्फे करण्यात आल्याची चर्चा आहे.

 

मागे

कौन बनेगा मुख्यमंत्री?
कौन बनेगा मुख्यमंत्री?

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्रीपदावरून भाजपा-शिवसेनेत जोर....

अधिक वाचा

पुढे  

कुणाची माय व्याली तरी नाणार पुन्हा होऊ देणार नाही -शिवसेना
कुणाची माय व्याली तरी नाणार पुन्हा होऊ देणार नाही -शिवसेना

नाणार प्रकल्पाच्या मुद्द्यावरून शिवसेना आणि भाजप पुन्हा एकदा आमने-सामने य....

Read more