ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

सख्खे भाऊ एकमेकांच्या विरोधात निवडणूक रिंगणात

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 11, 2019 06:02 PM 2019-02-12T14:15:30+5:30

सख्खे भाऊ एकमेकांच्या विरोधात निवडणूक रिंगणात

शहर : सातारा

माण विधानसभा मतदार संघात दोघे सख्खे भाऊ निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. एक भाऊ भाजप आणि दुसरा शिवसेनेच्या तिकिटावर एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. राज्यात भाजप आणि शिवसेना युती असली तरी माण मतदारसंघात अपवाद असल्याचे दिसून येत आहे. माण मतदार संघात भाजपकडून जयकुमार गोरे आणि शिवसेनेकडून शेखर गोरे हे सख्खे भाऊ एकमेकांच्या विरोधात लढत आहेत.

जयकुमार गोरे हे विद्यमान आमदार आहेत. ते काँग्रेसच्या तिकिटावर मागील निवडणुकीत आमदार झाले. मात्र यावेळी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तर जयकुमार गोरे यांचे बंधू शेखर गोरे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि माण मतदारसंघावर दावा केला. परंतु हा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला गेला. असे असताना शेखऱ गोरे यांनी जोरदार विरोध करत शिवसेनेकडून अधिकृत उमेदवारी मिळवली. त्यामुळे आता माण मतदार संघात भाजप विरुद्ध शिवसेना अशी लढत होणार असल्याने सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, दोन्ही भावानी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यास सुरुवात केली आहे. जयकुमार गोरे यांनी आमचे बंधू हे नेहमीच उभे राहतात आणि पडतात त्यांना पडण्याची सवय असल्याची टीका जयकुमार गोरे यांनी केली आहे. तर माजी आमदार जयकुमार गोरे यांनी कोणतीही विकास कामे केलेली नाहीत. आणि या दुष्काळी भागाचा पाणीप्रश्न देखील ते १० वर्षांत सोडवू शकले नसल्याची टीका शिवसेनेचे उमेदवार शेखर गोरे यांनी केली आहे

तर दुसरीकडे अपक्ष उमेदवार प्रभाकर देशमुख यांनीही गोरे बंधुवर जोरदार टीका केली आहे. जयकुमार गोरे आणि त्याचे बंधू शेखर गोरे याची माण मतदारसंघात दहशत आहे. त्यामुळे जनतेने परिवर्तन करायचे ठरवले आहे, असे अपक्ष प्रभाकर देशमुख यांनी म्हटले आहे.

 

मागे

निवडणुकीत मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी  राजकीय पक्षांची कोट्यवधींची उधळण
निवडणुकीत मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी राजकीय पक्षांची कोट्यवधींची उधळण

निवडणुकीत मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी करण्यता येणारी जाहीरातबाजी, प्रचा....

अधिक वाचा

पुढे  

मुख्यमंत्र्याचे हॅलिकॉप्टर चिखलात रुतल्यानंतर भाजपाची प्रतिक्रिया
मुख्यमंत्र्याचे हॅलिकॉप्टर चिखलात रुतल्यानंतर भाजपाची प्रतिक्रिया

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हेलिकॉप्टर पेण येथील बोरगाव येथे लॅण्ड ....

Read more