ठळक बातम्या शनिच्या अवकृपेपासून वाचण्यासाठी पिंपळवृक्षाखाली दिवा लावा!.    |     सूर्य देव कुंभात प्रवेश करेल, या राशींसाठी धन लाभाचे योग.    |     Magh Maas : पुण्य कमविण्यासाठी माघ महिन्याचे महत्त्व जाणून घ्या.    |     १०वी उत्तीर्णांसाठी संधी : लष्करात मेगा भरती.    |     पालकांनो इकडे लक्ष द्या, मुलांसाठी सॅनिटायझरचा वापर करताय !.    |    

भाजप कार्यकर्त्यांचं होमहवन, शिवनेसेनेला सदबुद्धी देवो

By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: नोव्हेंबर 07, 2019 05:11 PM 2019-02-12T14:15:30+5:30

भाजप कार्यकर्त्यांचं होमहवन, शिवनेसेनेला सदबुद्धी देवो

शहर : नागपूर

भाजप नेते भुषण शिंगने यांनी नागपूरच्या कल्याणेश्वर मंदिरात देवाकडे साकडे घातले की, शिवनेसेनेला देव सदबुद्धी देवो आणि देवेंद्र फडणवीस हे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे, अशा प्रकारे पुजा आणि हवन पार पडले.

कुणाचं सरकार येणार, मुख्यमंत्री कोण होणार? यावरुन अनेक खलबतं सुरु आहेत. बहुमत मिळवूनही भाजप-शिवसेना युतीचं सरकार अजूनही स्थापन न झाल्याने महायुतीचे कार्यकर्ते बुचकळ्यात पडले आहेत. त्यासाठी आता कार्यकर्त्यांनी होमहवन करण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्रातील सध्याची राजकीय स्थिती पाहता सर्वच राजकीय पक्ष चिंतेत आहेत.

नागपुरातील कल्याणेश्वर मंदिरात भाजपच्या कार्यकर्त्यांकडून पुजा आणि हवन करण्यात आलं. शिवसेनेला सदबुद्धी यावी आणि त्यांनी पुन्हा भाजपशी जुळवून घ्यावं, तसेच, देवेंद्र फडणवीस हेच पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत यासाठी हे होम-हवन करण्यात आले. यावेळी भाजप कार्यकर्त्यांच्या हातात शिवसेनेला सदबुद्धी दे भगवान अशा आशयाचे बॅनरही दिसले.

राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना महायुतीला जनादेश मिळाला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजप पुन्हा सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला आहे. परंतु मुख्यमंत्रिपदावरुन युतीत घोडे अडल्याने महायुतीची सत्ता स्थापन होण्यास विलंब होत आहे. विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून 15 दिवस उलटले. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीची तारीख अद्यापही ठरलेली नाही. त्यामुळे आता भाजप कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यामुळे आता कार्यकर्ते अशाप्रकारे देवाकडे साकडं घालत आहे.

मागे

'राज्यपालांशी चर्चा केली, आता भाजप निर्णय घेईल'
'राज्यपालांशी चर्चा केली, आता भाजप निर्णय घेईल'

'खाती कमी मिळाली तरी चालतील, पण मुख्यमंत्रीपद हवेच' अशी शिवसेना पक्षप्रम....

अधिक वाचा

पुढे  

'गोड बातमी' राहिली बाजूला, उलट गुंता वाढला...
'गोड बातमी' राहिली बाजूला, उलट गुंता वाढला...

'लवकरच गोड बातमी मिळेल', असं मावळते अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बु....

Read more