By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 13, 2019 07:55 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : विदेश
इंग्लंड - ब्रिटनच्या सार्वत्रिक निवडणुकीत पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या कंझर्व्हेटिव्ह पक्षाने बहुमत मिळवले आहे. आणि पुन्हा एकदा ते पंतप्रधानाच्या खुर्चीचा मान त्यांनी मिळवला आहे. अधिकृत एक्झिट पोलमध्ये पक्षाला 368 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. आतापर्यंत 650 जागांपैकी 595 जागांचे निकाल जाहीर झाले असून, बोरिस यांच्या कंझर्व्हेटिव्ह पक्षाने आतापर्यंत 326 जागांवर विजय मिळवत अखेर बहुमताचा आकडा गाठला आहे.
यूएक्सब्रिझ या आपल्या मतदारसंघातून विजय मिळवल्यानंतर ते म्हणाले की, ही एक ऐतिहासिक निवडणूक होती. आपण ब्रिटिश नागरिकांच्या मतांचा आदर केला पाहिजे. या बहुमतामुळे आम्ही ब्रेक्झिटचा निर्णय नक्कीच तडीस नेऊ.
दरम्यान, दुसरीकडे लेबर पार्टीला केवळ 191 जागांवर विजय मिळवता आला आहे. 1935 नंतरचा पक्षाचा हा सर्वात मोठा पराभव आहे. या पराभवानंतर पक्षाचे नेते जेरेमी कार्बिन यांनी यापुढील निवडणुकीत पक्षाचे नेतृत्व करणार नसल्याचे म्हटले आहे.
नवी दिल्ली - देशातील वाढत्या बलात्काराच्या घटनांवर संताप व....
अधिक वाचा