ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मराठा आरक्षणाबाबत लवकर कायदेशीर बाबी तपासून घटनापीठाकडे जाणार, सर्वपक्षीय नेत्यांची बैठकीत निर्णय

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: सप्टेंबर 16, 2020 10:15 PM 2019-02-12T14:15:30+5:30

मराठा आरक्षणाबाबत लवकर कायदेशीर बाबी तपासून घटनापीठाकडे जाणार, सर्वपक्षीय नेत्यांची बैठकीत निर्णय

शहर : मुंबई

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण कायद्याला अंतरिम स्थगिती दिल्यानंतर नुकतंच सर्वपक्षीय बैठक पार पडली. या बैठकीत पुढच्या न्यायालयीन लढाईवर चर्चा झाली. न्यायालयीन लढाई संपेपर्यंत काय दिलासा द्यायचा. त्यावर चर्चा झाली. लवकर कायदेशीर बाबी तपासून घटनापीठकडे जाणार, अशी माहिती  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्यासह अनेक संघटनांचे प्रतिनिधी बैठकीला उपस्थितीत होते.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन विरोधी पक्ष नेत्यांनी मला वचनं दिलं आहे. पुढच्या न्यायालयीन लढाईवर चर्चा झाली. न्यायालयीन लढाई संपेपर्यंत काय दिलासा द्यायचा, त्यावरही या बैठकीत चर्चा झाली.”

सर्वोच्च न्यायलयातील याचिका घटनापीठाकडे पाठवताना अनपेक्षितपणे आरक्षणाला स्थगिती दिली. आज विरोधी पक्षनेत्यांनी आपण सरकारसोबत आहोत असं आश्वासन दिलं आहे. यात कोणतंही राजकारण नाही. सर्व पक्ष एकत्र आहेत,” असे उद्धव ठाकरे म्हणाले.

यावर पर्याय कोणता, त्यावर मी नंतर बोलणार आहे. आरक्षणावर स्थगिती असताना मराठा विद्यार्थींना काय दिलासा द्यायचा याबाबत चर्चा झाली. आम्ही काही गोष्टी ठरवलेल्या आहेत. विरोधी पक्षनेत्यांशी चर्चा केली. इतर घटकांशीही चर्चा करायची आहे,” असे उद्धव ठाकरेंनी सांगितले.

मराठा समाजाने आंदोलन करु नका. मी पुन्हा आवाहन करतो. आधीच्या सरकारची टीम जशीच्या तशी आहे. मराठा समाजासाठी उद्या आणि परवा मोठ्या घोषणा करण्यात येतीलविरोधी पक्ष आणि सरकार यांचे याबाबत एकमत झालं आहे. मराठा समाजाचं सरकार ऐकतंय तेव्हा आंदोलनाची गरज नाही. आम्ही सर्व तुमच्यासोबत, आंदोलन करू नका,”

असे मुख्यमंत्री म्हणाले.

आम्ही सरकारसोबत, कुठलंही राजकारण आणणार नाहीदेवेंद्र फडणवीस

दरम्यान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही सरकारबरोबर आहोत. यात कुठलंही राजकारण आणणार नाही. राज्य सरकारने तीन पर्याय विचार करते आहे. अध्यादेश काढणे, फेरविचार याचिका दाखल करणे आणि खंडपीठाकडे जाणे. पहिले दोन पर्याय शासनाला योग्य वाटत नाही. तिसरा पर्याय योग्य वाटतो आहे. यात कुठलंही राजकारण आणणार नाही, असे फडणवीस म्हणाले.

मागे

"आत्तापासून मी भाजप-आरएसएससोबत", राज्यपालांच्या भेटीनंतर माजी नौदल अधिकाऱ्याची घोषणा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आक्षेपार्ह व्यंगचित्र सोशल मीडियावर पोस्ट ....

अधिक वाचा

पुढे  

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना कोरोनाची लागण
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना कोरोनाची लागण

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना कोरोनाची लागण झाली आहे. नितीन गडकरी यांन....

Read more