ठळक बातम्या शनिच्या अवकृपेपासून वाचण्यासाठी पिंपळवृक्षाखाली दिवा लावा!.    |     सूर्य देव कुंभात प्रवेश करेल, या राशींसाठी धन लाभाचे योग.    |     Magh Maas : पुण्य कमविण्यासाठी माघ महिन्याचे महत्त्व जाणून घ्या.    |     १०वी उत्तीर्णांसाठी संधी : लष्करात मेगा भरती.    |     पालकांनो इकडे लक्ष द्या, मुलांसाठी सॅनिटायझरचा वापर करताय !.    |    

महाआघडीचे उमेदवार आ. कुणाल पाटील अडकले वादाच्या भोवर्‍यात

By PRATIMA LANDGE | प्रकाशित: एप्रिल 10, 2019 10:09 AM 2019-02-12T14:15:30+5:30

महाआघडीचे उमेदवार आ. कुणाल पाटील अडकले वादाच्या भोवर्‍यात

शहर : धुळे

धुळ्यातील महाआघाडीचे उमेदवार आमदार कुणाल पाटील यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केल आहे. 'हिंदू राष्ट्र बनाना है, हे लिहिलेलं वाक्य वाचतो तेव्हा मनाला वेदना होतात' असं वक्तव्य त्यांनी केल आहे. आमदार कुणाल पाटील यांनी सोमवारीच त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. कुणाल पाटील यांचा हा धार्मिक तेढ निर्माण करायचा प्रयत्न असल्याचा आरोप विरोधकांनी त्यांच्यावर केला आहे. त्यांच्या या वक्तव्यावर टीकेची झोड उठवली जात आहे. 
'हिंदू राष्ट्र बनाना है वाचून मनाला वेदना होतात' या विधानामुळे धुळे लोकसभा मतदारसंघातले काँग्रेस उमेदवार कुणाल पाटील चांगलेच वादात अडकले आहे. कुणाल पाटील यांची मालेगाव शहरात प्रचारसभा चालू असताना त्यांनी केलेलं हे वक्तव्य सध्या चर्चेचा विषय ठरलेला आहे. कुणाल पाटील यांच्या या वक्तव्यामुळे  धार्मिक तेढ निर्माण होत असल्याचा आरोप भाजपा नेते प्रा. अरविंद जाधव यांनी त्यांच्यावर केला आहे 
धार्मिक मुद्द्यांवर मतांचं दुबजीकरण करणं उमेदवार आणि नेत्यांनी टाळल पाहिजे असं जाणकारांनी  आपल मत व्यक्त केले आहे.

मागे

प्रचारात उन्हाच्या तडाख्याने रावसाहेब दानवे आजारी , रुग्णालयात दाखल
प्रचारात उन्हाच्या तडाख्याने रावसाहेब दानवे आजारी , रुग्णालयात दाखल

प्रचारात उन्हाच्या तडाख्याने भाजप प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे आजारी पड....

अधिक वाचा

पुढे  

निवडणूक आयोगाने प्राप्तीकर विभागाची केली चांगलीच  कानउघाडणी
निवडणूक आयोगाने प्राप्तीकर विभागाची केली चांगलीच कानउघाडणी

प्राप्तिकर विभागाने ऐन निवडणुकीच्या काळात मध्य प्रदेश, कर्नाटक, तमिळनाडू आ....

Read more