ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

कॉपी बहाद्दर भाजपाला स्वतःचा जाहीरनामा ही करता आला नाही - धनंजय मुंडे

By Anuj Kesarkar | प्रकाशित: ऑक्टोबर 19, 2019 06:09 PM 2019-02-12T14:15:30+5:30

कॉपी बहाद्दर भाजपाला स्वतःचा जाहीरनामा ही करता आला नाही - धनंजय मुंडे

शहर : सातारा

विधानसभा निवडणूकीच्या संपूर्ण प्रचार कालावधीत राष्ट्रवादी काँग्रेसने मांडलेल्या मुद्दांची कॉपी करणार्‍या भाजपाला स्वतःचा स्वतंत्र जाहीरनामा ही करता आला नसून राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील मुद्दांचीच त्यांनी चोरी केल्याचे उघड झाल्याने परळीकरांमध्ये भाजपाचे चांगलेच हसे होत आहे.

निवडणूकीच्या पहिल्या दिवशी पासून धनंजय मुंडे यांनी परळीत आघाडी घेतल्याने भाजपाच्या पायाखालची वाळू घसरली आहे. सत्ता असतानाही पाच वर्षात कोणतेही सांगण्या सारखे काम नसल्याने जनतेसमोर कोणते तोंड घेवून जावे असा प्रश्न त्यांना पडला आहे. याच उद्विग्न माणसिकतेतून राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यातील जवळपास सगळेच मुद्दे भाजपने कॉपी-पेस्ट केल्याचे दिसून येत आहे.

वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकास आराखडा असो किंवा परळी शहर स्मार्ट सिटी करण्याचा विषय असो किंवा परळी रेल्वे स्थानकाचा विषय असो, शेती पासून ते ई-लर्नींग पर्यंत भाजपाच्या जाहीरनाम्यातील सर्वच मुद्दे राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यातून चोरून कॉपी केलेले दिसून येत आहेत.

प्रचाराच्या पहिल्या दिवसापासून प्रत्येक बाबीत कॉपी करणार्‍या पंकजाताईंनी धनंजय मुंडे यांच्यावर सातत्याने अत्यंत खालच्या पातळीवर जावून टीका केली, सर्व शक्ती पणाला लावली अगदी उदयन राजें पासून नरेंद्र मोदी पर्यंत सर्वांना परळीत प्रचाराला आणले तरी ही धनंजय मुंडेंच्या लोकप्रियतेला घटवू न शकल्याने आता प्रत्येक मुद्दा चोरून कॉपी-पेस्ट करण्याची वेळ ताईंवर आली असल्याचे बोलले जात आहे.

मागे

पराभवाच्या भितीने पाया खालची वाळू घसरली  - धनंजय मुंडे
पराभवाच्या भितीने पाया खालची वाळू घसरली - धनंजय मुंडे

पराभव दिसू लागल्याने परळी मतदारसंघातील भाजपाच्या उमेदवार पंकजा मुंडे यां....

अधिक वाचा

पुढे  

मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या उपस्थित मंत्रालयात मतदार जनजागृती अभियान
मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या उपस्थित मंत्रालयात मतदार जनजागृती अभियान

मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह, अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिं....

Read more