ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मुंबई शहर जिल्हा मतदान जनजागृतीसाठी नाशिकरांच्या मदतीने सायकल रॅली

By Anuj Kesarkar | प्रकाशित: ऑक्टोबर 17, 2019 08:00 PM 2019-02-12T14:15:30+5:30

मुंबई शहर जिल्हा  मतदान जनजागृतीसाठी नाशिकरांच्या  मदतीने सायकल रॅली

शहर : मुंबई

मुंबई, दि.16 – मुंबई शहर जिल्हयात मतदान जनजागृतीसाठी नाशिकरांच्या मदतीने सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. नाशिक सायकलनिष्ठ फाउंडेशन व मानवता हेल्प फाउंडेशन यांच्या वतीने मतदान प्रबोधन सायकल रॅली होणार आहे. 
या सायकल रॅलीसाठी नाशिक येथून 20 सायकलस्वार आज दि. 16 ऑक्टोंबर  रोजी मुंबई गेट वे ऑफ इंडिया येथे दाखल झाले आहेत.
 दि. 17 ऑक्टोंबर रोजी सकाळी 7.00 वाजता गेट वे ऑफ इंडिया येथून या सायकल रॅलीला सुरुवात होणार असून मरिन ड्राईव्ह, महालक्ष्मी, सिध्दीविनायक मंदिर, शिवाजी पार्क, दादर या मार्गे ठाणे येथे पोहचणार आहे.
गेट वे ऑफ इंडिया येथून सुरु होणाऱ्या सायकल रॅलीमध्ये मा.केंद्रीय निवडणूक निरीक्षक, जिल्हाधिकारी, १० विधानसभा मतदारसंघातील निवडणूक निर्णय अधिकारी सहभागी होणार आहेत. विधानसभा निवडणूकीत मतदानाची टक्केवारी वाढावी, मतदान करण्यास प्रोत्साहीत करणे. मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य असल्याची मतदारांना जाणीव करुन देण्यासाठी या रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. 

मागे

निवडणूक काळात एक्झिट पोल, ओपिनियन पोल जाहीर करण्यास भारतीय निवडणूक आयोगाची मनाई
निवडणूक काळात एक्झिट पोल, ओपिनियन पोल जाहीर करण्यास भारतीय निवडणूक आयोगाची मनाई

भारतीय निवडणूक आयोगाने निवडणूक एक्झिट पोल जाहीर करण्यास मनाई करण्यात आली आ....

अधिक वाचा

पुढे  

मोदींच्या सभेवरून परतणार्‍या बंदोबस्ताच्या गाडीला अपघात; धनंजय मुंडे आले मदतीला धावून
मोदींच्या सभेवरून परतणार्‍या बंदोबस्ताच्या गाडीला अपघात; धनंजय मुंडे आले मदतीला धावून

सिरसाळा (प्रतिनिधी) :-   पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची परळी येथील सभेचा बंदो....

Read more