ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

संजय राऊत यांच्यासोबतच्या भेटीवर फडणवीस म्हणतात..

By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: सप्टेंबर 28, 2020 12:05 PM 2019-02-12T14:15:30+5:30

संजय राऊत यांच्यासोबतच्या भेटीवर फडणवीस म्हणतात..

शहर : मुंबई

शिवसेना नेते संजय राऊत आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची काल मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये भेट झाली. या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आलं होतं. या भेटीमुळे राज्यात राजकीय भूकंप तर होणार नाही ना? अशा चर्चा देखील रंगू लागल्या आहेत. मात्र, ही भेट सामना मधील मुलाखती संदर्भातील असल्याची प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. याआधी संजय राऊत यांनी देखील अशीच प्रतिक्रिया दिली होती.

शिवसेना-भाजप यांच्यातील युती तुटल्यानंतरची ही पहिलीच भेट असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. या भेटीनंतर भाजप मधील नेत्यांनी राजकारणात काहीही शक्य आहे. मात्र, ही भेट राजकीय नसल्याची प्रतिक्रिया दिल्याने शंकेला वाव असल्याचे राजकीय जाणकार म्हणत आहेत. तर देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतची भेट गुप्त नव्हती. सामनाच्या मुलाखती संदर्भात असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले.

शिवसेनेसोबत सरकार स्थापन करण्याविषयी कोणतीही चर्चा झालेली नाही. हे सरकार अपयशी ठरले असून लोकांच्या मनात सरकारविषयी राग आहे. त्यामुळे अंतर्विरोधामुळेचं हे सरकार पडेल, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली. आमची भेट ही सामना मधील मुलाखती संदर्भातील असल्याचेही ते म्हणाले. दरम्यान, संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांची मुंईतील एका हॉटेलमध्ये भेट झाली. या दोन्ही नेत्यांनी तब्बल दोन तास चर्चा केल्याची सुत्रांची माहिती आहे. हॉटेलमध्ये याविषयी कोणालाही सांगण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या होत्या.

आम्ही हे सरकार पाडणार नाही, ती आमची संस्कृती नाही : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील

देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांची भेटविषयी कसलीही माहिती नाही. देवेंद्र फडणवीस आणि मी एका वेबिनारमध्ये सोबत होतो. राजकीय क्षेत्रात अश्या भेटी होत असतात, त्यात बातमी असते असं नाही. गेली नऊ महिने देवेंद्र फडणवीस किंवा मी आम्ही पुन्हा सरकार बनवणार असं म्हटलं नाही. हे सरकार त्यांच्या अंर्तविरोधामुळे पडणार असं आम्ही म्हणतोय. आम्ही हे सरकार पाडणार नाही, ती आमची संस्कृती नाही, अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

 

मागे

भाजपचे आणखी काही नगरसेवक आमच्या संपर्कात : आमदार संग्राम जगताप
भाजपचे आणखी काही नगरसेवक आमच्या संपर्कात : आमदार संग्राम जगताप

“अहमदनगरला भाजपचे आणखी काही नगरसेवक आमच्या संपर्कात असून, ते देखील येत्य....

अधिक वाचा

पुढे  

दोन पक्षांचे बडे नेते राजकारणावरच चर्चा करणार ना, चहा-बिस्किटावर नाही : चंद्रकांत पाटील
दोन पक्षांचे बडे नेते राजकारणावरच चर्चा करणार ना, चहा-बिस्किटावर नाही : चंद्रकांत पाटील

दोन वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे दोन बडे नेते भेटतात, तेव्हा राजकारणावर चर्च....

Read more