ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

अजून खातेवाटपच झाले नाही तर पाच दिवसांच्या अधिवेशनात नेते तरी काय बोलणार- देवेंद्र फडणवीस

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 10, 2019 07:16 PM 2019-02-12T14:15:30+5:30

अजून खातेवाटपच झाले नाही तर पाच दिवसांच्या अधिवेशनात नेते तरी काय बोलणार- देवेंद्र फडणवीस

शहर : मुंबई

मुंबई - माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज सर्वात मोठा हल्लाबोल केलाय. गेल्या 13 दिवसांपासून सत्तेवर आलेल्या सरकारने साधं खातेवाटपही केलं नाही. चांगल्या प्रकल्पांना स्थगिती देण्याशिवाय हे सरकार कुठलंच काम करत नाही आहे. शेतकरी हे मदतीच्या प्रतिक्षेत आहेत त्यांना केव्हा मदत मिळणार हे माहित नाही. त्यामुळे सगळी कामं बाजूला सारून पहिले शेतकऱ्यांना मदत करा असं आव्हानही त्यांनी सरकारला केलं. 


आम्ही सहकार्यासाठी तयार आहोत मात्र सरकारचं काम वेगात चालत नाही अशी टीकाही त्यांनी केली. फडणवीस पुढे म्हणाले, नागपूरात फक्त नावापुरतं अधिवेशन घेतलं जातंय. हे अधिवेशन 15 दिवसांचं व्हावं अशी मागणी आम्ही केली होती. मात्र ती मान्य करण्यात आलेली नाही. फक्त पाच दिवसांच्या अधिवेशनात काय होणार आहे. खातेवाटप झालं नाही तर मंत्री कशी उत्तरं देणार असा सवालही त्यांनी केला. 


नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावर शिवसेनेने लोकसभेत सरकारच्या बाजूने मतदान केलं. तर राज्यसभेत विधेयक येणार असल्याने आता काँग्रेस वेगळी भूमिका घेत आहेत. काँग्रेसच्या दबावामुळे शिवसेनेने ही भूमिका घेतली असून त्यांनी आपल्या मुळ भूमिकेवर कायम राहात विधेयकाचं समर्थन करावं असं मतही त्यांनी व्यक्त केलंय. 
 

मागे

भाजपा आणि शिवसेना यांनी एकत्र यावं - शिवसेना नेते मनोहर जोशी
भाजपा आणि शिवसेना यांनी एकत्र यावं - शिवसेना नेते मनोहर जोशी

भाजपा आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी एकत्र यायला हवं हेच चांगलं आहे असं मला ....

अधिक वाचा

पुढे  

 १६ डिसेंबरपासून विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाची सुरुवात होणार..
१६ डिसेंबरपासून विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाची सुरुवात होणार..

१६ डिसेंबरपासून विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरू होणार आहे. अधि....

Read more