ठळक बातम्या शनिच्या अवकृपेपासून वाचण्यासाठी पिंपळवृक्षाखाली दिवा लावा!.    |     सूर्य देव कुंभात प्रवेश करेल, या राशींसाठी धन लाभाचे योग.    |     Magh Maas : पुण्य कमविण्यासाठी माघ महिन्याचे महत्त्व जाणून घ्या.    |     १०वी उत्तीर्णांसाठी संधी : लष्करात मेगा भरती.    |     पालकांनो इकडे लक्ष द्या, मुलांसाठी सॅनिटायझरचा वापर करताय !.    |    

“धनंजय मुंडे आणि त्यांचे आमदार तोडपाणी करतात”; पंकजां मुंडेचा गंभीर आरोप

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: एप्रिल 07, 2019 05:27 PM 2019-02-12T14:15:30+5:30

“धनंजय मुंडे आणि त्यांचे आमदार तोडपाणी करतात”; पंकजां मुंडेचा गंभीर आरोप

शहर : बीड

धनंजय मुंडे आणि त्यांचे आमदार तोडपाणी करतात. त्यामुळे ते गोपीनाथ मुंडे यांचे वारस होऊ शकत नाहीत, असा घणाघात ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी केलाय. जिंतूर इथल्या सभेत त्या बोलत होत्या. अनेक घरात भांडणं लावण्याचं काम राष्ट्रवादीने केल्याचा आरोपही पंकजा मुंडे यांनी केला आहे.

'गोपीनाथ मुंडे जेव्हा विरोधी पक्षनेते होते, तेव्हा त्यांनी सत्तेतल्या सरकारला जेरीस आणलं होतं. पण आत्ताचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे एकीकडे मंत्र्यांच्या विरोधात लक्षवेधी लावतात आणि दुसरीकडे सेटिंग करतात', अशी घणाघाती टीका पंकजा मुंडे यांनी केली आहे.

'तोडपाणी करणारे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि त्यांचे आमदार गोपीनाथ मुंडेंचे वारस होऊ शकत नाहीत,' असं पंकजा मुंडे म्हणाल्या. अनेक घरांमध्ये भांडणं लावण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेसने केलं आहे. मुंडे घराण्यात ते घराणेशाही बोलतात, पण बारामतीला जाऊन चमचेगिरी करतात, असा टोलाही पंकजा मुंडेंनी लगावला. युतीचे उमेदवार संजय जाधव यांच्या प्रचारासाठी पंकजा मुंडे जिंतूरमध्ये आल्या होत्या.

दरम्यान पंकजा मुंडेंच्या या आरोपाला धनंजय मुंडे यांनीही प्रत्युत्तर दिलं आहे. 'मी वारस नाही. वारसा फक्त पंकजा मुंडे चालवत आहेत. वैद्यनाथ कारखान्यावर जप्ती आली. हा वारसा तुम्ही सांभाळत आहात काय? बीड जिल्ह्याला मागसलेपणाचा कलंक लागला आहे. तुम्ही वर्ष सत्तेत होतात, पण बीड जिल्ह्याला काय दिलं? निवडणूक आली की गोपीनाथ मुंडेंचे वारस असल्याचं भान येतं, पण मागच्या वर्षात गोपीनाथ मुंडेंना अभिप्रेत असलेलं काम तुमच्याकडून झालं नाही, अशी टीका धनंजय मुंडेंनी केली.

 

मागे

माझं घर भरलेलं आहे, तुम्ही तुमचं अगाेदर पाहा ; पवारांचा माेदींना टाेला
माझं घर भरलेलं आहे, तुम्ही तुमचं अगाेदर पाहा ; पवारांचा माेदींना टाेला

माझं घर भरलेले आहे तुमचं घर आगोदर पाहा असा टोला माजी केंद्रीय कृषीमंञी शरद प....

अधिक वाचा

पुढे  

मोदी इतरवेळी ठीक असतात, पण निवडणुका आल्या की त्यांच्या अंगात येतं - शरद पवार
मोदी इतरवेळी ठीक असतात, पण निवडणुका आल्या की त्यांच्या अंगात येतं - शरद पवार

मोदी यंदा पंतप्रधान होणार नाहीत, खासदार होतील, असं वक्तव्य शरद पवार यांनी के....

Read more