ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

शरद पवारांच्या सभेला रिकाम्या खुर्च्या

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: एप्रिल 10, 2019 02:07 PM 2019-02-12T14:15:30+5:30

शरद पवारांच्या सभेला रिकाम्या खुर्च्या

शहर : मुंबई

शरद पवार यांची सभा तब्बल 2 तास उशिराने सुरू झाल्याने त्यांच्या सभेतून लोकांनी काढता पाय घेतला. 7.30 वाजता सुरू होणारे पवारांचे भाषण रात्री 9 वाजता सुरू झाले त्यामुळे त्याना हा फटका बसला असल्याचे समजते. पवारांचे भाषणही लांबतच गेल्याने लोकांनी भाषणाकडे पाठ फिरवत घरचा रस्ता धरला. त्यामुळे सभास्थळी अनेक खुर्च्या रिकाम्या पडल्याचे चित्र दिसू लागलेे. याबाबत स्थानिक लोकांकडू जोमाने चर्चाही होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बाबाजी पाटील यांच्या प्रचारार्थ उल्हासनगरच्या गोलमैदान येथे पवारांची सभा झाली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार ज्योती कलानी यांनी या सभेचे आयोजन केले होते. गणेश नाईक, संजीव नाईक, प्रमोद हिंदुराव आदी नेतेही सभेला उपस्थित होते.  7.30 वाजता पवारांच्या भाषणाला सुरुवात होणे अपेक्षित होते. मात्र, रात्री 9.00 वाजत पवार यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. 

मागे

निवडणूक आयोगाने प्राप्तीकर विभागाची केली चांगलीच  कानउघाडणी
निवडणूक आयोगाने प्राप्तीकर विभागाची केली चांगलीच कानउघाडणी

प्राप्तिकर विभागाने ऐन निवडणुकीच्या काळात मध्य प्रदेश, कर्नाटक, तमिळनाडू आ....

अधिक वाचा

पुढे  

कोकणच्या विकासाचा म्हणून चक्क आयर्लंडचा रस्ता, राऊतांनी ’छापून दाखवलं’
कोकणच्या विकासाचा म्हणून चक्क आयर्लंडचा रस्ता, राऊतांनी ’छापून दाखवलं’

रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाच्या  निवडणूकीच्या रणधुमाळीत प्....

Read more