ठळक बातम्या शनिच्या अवकृपेपासून वाचण्यासाठी पिंपळवृक्षाखाली दिवा लावा!.    |     सूर्य देव कुंभात प्रवेश करेल, या राशींसाठी धन लाभाचे योग.    |     Magh Maas : पुण्य कमविण्यासाठी माघ महिन्याचे महत्त्व जाणून घ्या.    |     १०वी उत्तीर्णांसाठी संधी : लष्करात मेगा भरती.    |     पालकांनो इकडे लक्ष द्या, मुलांसाठी सॅनिटायझरचा वापर करताय !.    |    

ग्रामपंचायत निवडणुकीत कुणाची चांदी? कागदपत्रांसाठी उमेदवारांची लूट!

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: डिसेंबर 27, 2020 11:19 AM 2019-02-12T14:15:30+5:30

ग्रामपंचायत निवडणुकीत कुणाची चांदी? कागदपत्रांसाठी उमेदवारांची लूट!

शहर : औरंगाबाद

 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांना आपलं जातपडताळणी प्रमाणपत्र देणं बंधनकारक आहे. मात्र अनेक ठिकाणी जातपडताळणी कार्यालयात उमेदवारांची लूट सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. अक्षरश: रांगा लावून उमेदवारांकडून पैसे घेत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता जातपडताळणी केंद्रांवर गर्दी होत आहे. अशावेळी कागदपत्र दाखल करुन घेताना उमेदवारांकडून 100 ते 200 रुपये घेतले जात आहेत.

ग्रामपंचायत निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. त्यासाठी उमेदवारांना जातपडताळणी प्रमाणपत्र आवश्यक आहे. अशावेळी किमान प्रमाणपत्रासाठी अर्ज दाखल केल्याची पावती तरी निवडणूक आयोगाकडे सादर करावी लागते. त्यामुळे सध्या जातपडताळणी केंद्राबाहेर मोठ्या रांगा लागल्या आहेत. औरंगाबादच्या जातपडताळणी केंद्राबाहेरही सध्या हेच चित्र पाहायला मिळत आहे. मात्र याठिकाणी इच्छुक उमेदवारांकडून मोठ्या प्रमाणात पैसे हडपण्याचा प्रकार सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे.

राखीव जागांवरील उमेदवारांसाठी सवलत

राखीव जागांवर ग्रामपंचायत निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी एक सवलत देण्यात आली आहे. जात वैधता प्रमाणपत्राऐवजी पडताळणी समितीकडे हे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी केलेल्या अर्जाची सत्यप्रत अथवा पोचपावती किंवा अर्ज केल्याबाबतचा कोणताही पुरावा सादर करण्याची मूभा देण्यात आलीय. राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी ही माहिती दिली आहे.

राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी 30 डिसेंबर 2020 पर्यंत नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची अंतिम मुदत आहे. राखीव जागांवर निवडणूक लढवण्यासाठी नामनिर्देशपत्र दाखल करताना जात वैधता प्रमाणपत्रासाठी केलेल्या अर्जाबाबतचा पुरावा सादर करण्याबरोबरच एक हमीपत्रही देणं गरजेचं आहे. विजयी झाल्याच्या दिनांकापासून 12 महिन्यांच्या आत पडताळणी समितीने दिलेले जात वैधता प्रमाणपत्र सादर केलं जाईल, असं हमीपत्रात नमूद करावं लागणार आहे.

ग्राम पंचायत निवडणुकांबाबत महत्त्वाची माहिती

1. जात प्रमाणपत्राची पडताळणी आणि वैधता प्रमाणपत्र ऑनलाइन मिळेल

2. जात पडताळणीचा अर्ज एक खिडकी योजनेतून मिळेल

3. जातपडताळणी समितीला द्यावयाचा अर्ज तहसीलमध्ये मिळेल

4. निवडणूक जिंकल्यानंतर वैधता प्रमाणपत्र, जात पडताळणी प्रस्तावाची पोचपावती, ऑनलाइन पैसे भरल्याची पावती 12 महिन्यांत द्यावी लागेल

5. उमेदवाराला एका प्रभागातून एकच उमेदवारी अर्ज भरता येणार

6. अर्ज ऑनलाईन भरल्यानंतर हमीपत्र आणि घोषणापत्र निवडणूक अधिकाऱ्याला द्यावे

7. खर्च हिशेब देताना हमीपत्र, अपत्यांचे प्रमाणपत्र, शौचालय वापर प्रमाणपत्र, डिपॉझिटची पावती द्यावी लागेल

8. 190 मुक्त चिन्हांपैकी उमेदवाराला 5 निवडणूक चिन्हे निवडता येणार

9. एका प्रभागात एका उमेदवाराचे चिन्ह दुसऱ्या उमेदवाराला मिळणार नाही

10. ग्रामपंचायतीचा थकबाकीदार, ठेकेदार नसल्याचे प्रमाणपत्र, नावात बदल नसल्याचे प्रमाणपत्र द्यावे लागेल

11. 7 आणि 9 सदस्यांच्या पंचायतीत खर्च मर्यादा 25 हजार रुपये

12. 11 आणि 13 सदस्यांच्या पंचायतीत खर्च मर्यादा 35 हजार रुपये

13. 15 आणि 17 सदस्यांच्या पंचायतीत खर्च मर्यादा 50 हजार रुपये

14. खुल्या प्रवर्ग उमेदवारांसाठी 500 रुपये डिपॉझिट

15. SC-ST, OBC उमेदवारांसाठी 100 रुपये डिपॉझिट

मागे

शरद पवारांनंतर तुमचं स्थान काय राहील? चंद्रकांत पाटलांचा अजितदादांना खडा सवाल
शरद पवारांनंतर तुमचं स्थान काय राहील? चंद्रकांत पाटलांचा अजितदादांना खडा सवाल

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी पुण्यात पत्रकार परिषद घे....

अधिक वाचा

पुढे  

शरद पवार यूपीए अध्यक्ष होणार का, पी. चिदंबरम काय म्हणाले?
शरद पवार यूपीए अध्यक्ष होणार का, पी. चिदंबरम काय म्हणाले?

“संयुक्त पुरोगामी आघाडी (UPA) चे अध्यक्षपद म्हणजे पंतप्रधानपद नाही. आघाडीमध....

Read more