ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मतदानाच्या दिवशी शिक्षकाचा मृत्यू, बोगस मतदान, 2 गटात राडा

By Dinesh Shinde | प्रकाशित: ऑक्टोबर 21, 2019 05:16 PM 2019-02-12T14:15:30+5:30

मतदानाच्या दिवशी शिक्षकाचा मृत्यू, बोगस मतदान, 2 गटात राडा

शहर : मुंबई

राज्यात आज विधानसभा निवडणुकीत अनेक ठिकाणी काही धक्कादायक घटना घडल्याचे उघडीस आले आहे. यात गडचिरोली येथे अतिसंवेदनशील मतदान केंद्रावर कर्तव्यासाठी पायी जाणार्‍या शिक्षकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटनेचा समावेश आहे. तर जालना येथील अंबडच्या जामखेडमध्ये मतदारांना गाडीत बसवून आणल्याने राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये जुंपल्याचे पाहायला मिळाले. यानिमित्त क्षीरसागर काका पुतण्या एकमेंकासमोर उभे ठाकले.

मुंबईत वरळीतील एका मतदान केंद्रावर पाच मशीन बदलल्यामुळे पुन्हा मतदान करण्यात आले. अशाच प्रकारे काही भागात मतदान यंदा बंद पडल्यामुळे मतदारांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे दिसून आले.

खामगावच्या भाजपकडून बूथ कॅप्चरिंग होत असल्याचा आरोप काँग्रेसचे उमेदवार ज्ञानेश्वर पाटील, माजी आमदार दिलीप कुमार साळंदा व त्यांच्या समर्थकांनी केला. अकोल्यात मतदान केंद्रावर काँग्रेस उमेदवार साजिद खान पठाण आणि पोलिसांत चकमक उडाली.

मागे

महाराष्ट्रात 5 वाजेपर्यंत 45 % आणि हरियाणात 55% मतदान
महाराष्ट्रात 5 वाजेपर्यंत 45 % आणि हरियाणात 55% मतदान

महाराष्ट्राच्या 288 आणि हरियाणाच्या 90 विधानसभा जागांसाठी मतदान सुरु आहे. मुख....

अधिक वाचा

पुढे  

आरपीआय कार्यकर्त्याने EVM वर फेकली शाई
आरपीआय कार्यकर्त्याने EVM वर फेकली शाई

राज्यभरात सोमवारी विधानसभा निवडणुकीचे मतदान होत आहे. मतदान करण्यासाठी अवघ....

Read more