ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

पहिले अवयव दान केलेल्या युवकाच्या आईने मतदानावर बहिष्कार टाकत केले उपोषण

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: एप्रिल 19, 2019 04:01 PM 2019-02-12T14:15:30+5:30

पहिले अवयव दान केलेल्या  युवकाच्या  आईने  मतदानावर बहिष्कार टाकत  केले उपोषण

शहर : लातूर

लातूर जिल्ह्यामध्ये २०१७ च्या साली किरण लोभे या तरुणाचा मृत्यू झाला होता. या तरुणाच्या कुटुंबियांनी त्याच्या अवयव दानाचा निर्णय घेतला. हृदय, मूत्रपिंड आणि डोळे दान करण्यात आले. लातूरमधली ही अवयव दानाची पहिलीच घटना होती. या घटने नंतर घरातील करता पुरुष गेला म्हणून, गरीब कुटुंबाला आधार देण्याचे आश्वासन आमदार, प्रशासन आणि नगरसेवकांनी दिले होते. मात्र असे कोणतेच आश्वासन कुणीच पाळले नाही. अडचणीत आलेल्या या कुटुंबाने आज मतदानावर बहिष्कार टाकला होता. त्यांनी शहरातील टाऊन हॉलच्या मैदानावर उपोषण सुरु केले. त्याला अनेकांनी साथ दिली. यात किरणची आई लताबाई, भाऊ सचिन आणि विकास सहभागी झाले आहेत. जिल्हाधिकार्यांनी या कुटुंबाला भेटण्याचं आश्वासन दिलंय असं समजतं पण त्याला दुजोरा मिळाला नाही. त्यामुळे एखाद्या घरातील व्यक्तीने जर समाज उपयोगी काम केले तर त्याला प्रोत्साहन दिले गेले पाहिजे. अवयव दान केल्याने अनेकांचे प्राण वाचतात, तर अवयव मिळाले नाही म्हणून देशात हजारो लोक मृत्यू मुखी पडतात, त्यामुळे         या कुटुंबाला मदत केली पाहिजे असे मत अनेक व्यक्त करत आहेत.

मागे

लोकसभा निवडणूक 2019,मतदान कसं करतात?
लोकसभा निवडणूक 2019,मतदान कसं करतात?

देशात सध्या लोकसभा निवडणुकांसाठी मतदान सुरू आहे. पण मतदान कसं केलं जातं, त्य....

अधिक वाचा

पुढे  

शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे सरकारचं दुर्लक्ष- शरद पवार
शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे सरकारचं दुर्लक्ष- शरद पवार

आपल्या देशात शेतकऱ्याच्या हिताचा विचार केला जात नाही. शेती आणि शेतकऱ्यांचा....

Read more