ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

'एसपीजी'बाबत सरकारचे नवे नियम

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 07, 2019 07:02 PM 2019-02-12T14:15:30+5:30

'एसपीजी'बाबत सरकारचे नवे नियम

शहर : देश

केंद्र सरकारने एसपीजी सुरक्षेबाबत नवे नियम केले आहेत. या नव्या नियमांनुसार आता परदेश दौऱ्यावरही एसपीजी सुरक्षा नेत्यांसोबत राहिल. भारतामध्ये सध्या एसपीजी सुरक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशिवाय तिघांनाच मिळत आहे.

ज्यांना एसपीजी सुरक्षा देण्यात आली आहे, ते परदेशात जाताना पहिल्या पॉईंटपर्यंत सुरक्षा घ्यायचे, पण नंतर वैयक्तिक कारण सांगून एसपीजीला परत पाठवलं जायचं, त्यामुळे सरकारने हा निर्णय घेतला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींशिवाय सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वाड्रा यांना एसपीजी सुरक्षा मिळाली आहे. नव्या नियमांनुसार आता या सगळ्यांना परदेश दौऱ्यावर असताना आपल्यासोबत एसपीजी ठेवावी लागणार आहे.ज्यांना एसपीजीची सुरक्षा मिळाली आहे ते देशाच्या बाहेर जरी असले तरी त्यांना एसपीजी सुरक्षा असेल. या नेत्यांना त्यांच्या परदेश दौऱ्याची माहितीदेखील सरकारला द्यावी लागेल.

मागे

काँग्रेस महाआघाडीचा शपथनामा जाहीर
काँग्रेस महाआघाडीचा शपथनामा जाहीर

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आपला संयुक्त जाहीरनामा प्रकाश....

अधिक वाचा

पुढे  

ईडीच्या कारवाईवरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा
ईडीच्या कारवाईवरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा

ईडीच्या कारवाईवरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी भाजपावर निशाणा साधल....

Read more